Vastu Shastra : कितीही कमावलं तरी घरात पैसा टिकतच नाही? तर मग करा वास्तुशास्त्रातील हे 3 प्रभावी उपाय

अनेकदा आपण खूप कष्ट करतो, पैसे कमावतो, मात्र घरात पैसा टिकत नाही. पैसा कायम खर्च होत राहतो. असं होऊ नये, घराला आर्थिक स्थैर्य प्राप्त व्हावं, यासाठी वास्तुशास्त्रात काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत. त्याबद्दलच आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

Vastu Shastra : कितीही कमावलं तरी घरात पैसा टिकतच नाही? तर मग करा वास्तुशास्त्रातील हे 3 प्रभावी उपाय
वास्तुशास्त्र
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 01, 2026 | 8:12 PM

प्रत्येकाला वाटतं की आपलं आयुष्य सुखा समाधानात जावं, आपल्याला भविष्यात कोणतीही आर्थिक अडचण येऊ नये. आपल्या कुटुंबातील व्यक्ती नेहमी आनंदी राहाव्यात, त्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण व्हाव्यात. परंतु अनेकदा होत काय की, आपण यासाठी प्रचंड कष्ट करतो. मोठ्या प्रमाणात पैसा देखील कमावतो. मात्र हा पैसा आपल्या हातात टिकत नाही. जेवढा हातात पैसा येतो, तेवढा पैसा खर्च होतो. महिन्याच्या शेवटी बँक खात्यात एकही रुपया नसतो. आपल्या आयुष्यात अशा प्रकारच्या अडचणी घरात वास्तुदोष निर्माण झाल्यामुळे येऊ शकतात. घरात जर वास्तुदोष निर्माण झाला तर अचानक एखादं मोठं आर्थिक संकट येणं, व्यवसायामध्ये तोटा होणं अशा प्रकारच्या काही गोष्टी आपल्यासोबत घडू शकतात, अशा गोष्टी आपल्यासोबत घडू नये, यासाठी वास्तुशास्त्रात काही खास उपाय सांगण्यात आले आहेत, त्यातीलच काही उपायांबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहेत.

घरातील ईशान्य कोपरा – तुमच्या घरातील ईशान्य दिशा ही अत्यंत महत्त्वाची आहे. वास्तुशास्त्रानुसार आणि हिंदू धर्मशास्त्रानुसार ईशान्य दिशा ही देवाची दिशा असते, त्यामुळेच या दिशेला देवघर असावं असा सल्ला वास्तुशास्त्रात देण्यात आला आहे. तसेच ईशान्य दिशा ही नेहमी स्वच्छ ठेवावी. जर तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात काही राडा असेल, जसं की भंगार सामान, बंद पडलेल्या वस्तू किंवा रद्दी, तर या गोष्टी या कोपऱ्यातून तात्काळ हलवाव्यात. ईशान्य कोपरा हा नेहमी स्वच्छ असला पाहिजे. ही दिशा कधीही अस्वच्छ असू नये, असं वास्तुशास्त्र सांगतं.

पाण्याचा उपाय – जर तुमच्या घरात पैसा टिकत नसेल तर त्यासाठी वास्तुशास्त्रात आणखी एक सोपा उपाय सांगण्यात आला आहे. तुमच्या घराच्या ईशान्य दिशेला दररोज एका तांबा धातूच्या तांब्यामध्ये पाणी झाकून ठेवावं, त्यानंतर तुम्ही हे पाणी प्राशन करावं, यामुळे तुमच्या घरातील सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर होतील, तुमच्या घराला आर्थिक स्थैर्य लाभेल असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

दिवा – तसेच याबाबत वास्तुशास्त्रात आणखी एक सोपा उपाय सांगण्यात आला आहे, तो म्हणजे जर तुमच्या घराला आर्थिक स्थैर्य लाभत नसेल तर तुम्ही नित्यनियमाने सायंकाळच्या वेळी ईशान्य दिशेला शुद्ध तुपाचा दिवा लावा. या दिव्यामध्ये थोडं चदनाचं आत्तर मिक्स करा. या उपायामुळे घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, असं वास्तुशास्त्रात म्हटलं आहे. एवढंच नाही तर तुमच्या घराची पूर्व दिशा देखील नेहमी स्वच्छ असावी, असं देखील वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us