Vastu Shastra : घरात अचानक खर्च वाढलाय? पैसे पुरत नाहीयेत? मग करा हे सोपे उपाय
अनेकदा असं होतं की आपल्या दैनंदिन खर्चात अचानक मोठी वाढ होते, हातात येणारा पैसा पुरत नाही. असं का होतं? याचा कधी तुम्ही विचार केलाय का? वास्तुशास्त्रानुसार याला दोन गोष्टी कारणीभूत असतात, एक म्हणजे तुमच्या घरात निर्माण झालेली नकारात्मक ऊर्जा आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे राहू आणि शनी देव यांची नाराजी.

वास्तुशास्त्रामध्ये तुमच्या आयुष्यात येणाऱ्या विविध समस्यांवर उपाय सांगण्यात आले आहेत. आपल्यापैकी अनेकांनी हा अनुभव घेतला असेल की अचानक खर्चात मोठी वाढ होते. इच्छा नसताना देखील अनावश्यक गोष्टींवर मोठ्या प्रमाणात पैसा खर्च होतो. आपण खर्चावर नियंत्रण मिळवण्याचा खूप प्रयत्न करतो मात्र आपण खर्चावर नियंत्रण ठेवू शकत नाही. यामुळे होतं काय की आपल्याला पैसे पुरत नाही, पैशांची कमतरता जाणवू लागते. आर्थिक समस्या निर्माण होतात. हे असं का होतं? याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? वास्तुशास्त्रानुसार अशी परिस्थिती दोन कारणांमुळे निर्माण होते, एक तर जेव्हा तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा असेल तेव्हा आणि दुसरं म्हणजे तुमच्या कुंडलीमध्ये जर शनी दोष किंवा राहु दोष असेल तर तुमच्या खर्चांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. आज आपण यावर काही उपाय जाणून घेणार आहोत. जर घरात अनावश्यक खर्च वाढला असेल तर सर्वात प्रथम ऊर्जा संतुलन करणं गरजेचं असतं, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.
मिठाचं पाणी – जेव्हा तुम्ही सकाळी तुमचं घर पाण्याने पुसून घेता, तेव्हा त्या पाण्यात थोडं मीठ टाका. त्यानंतर या पाण्याने तुमचं सर्व घर पुसून काढा. कारण वास्तुशास्त्रामध्ये मिठाला स्थिरतेचं कारक माण्यात आलं आहे. जर तुम्ही तुमचं संपूर्ण घर हे मिठाच्या पाण्याने पुसून काढलं तर घरात ऊर्जा संतुलन निर्माण होतं. तसेच घरातील शनी दोष आणि राहु दोष कमी होतो. ज्यामुळे तुमच्या खर्चावर नियंत्रण येते.
लाल धागा – ऊर्जा संतुलनासाठी तुम्ही तुमच्या पाकिटामध्ये लाल धागा ठेवू शकता, यामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. ज्याचा प्रभाव तुमच्यावर पडतो आणि खर्चावर नियंत्रण येते.
काळे तीळ दान करा – काळे तीळ हे दोघांनाही शनी देव आणि राहुला प्रिय आहेत. त्यामुळे जर तुम्ही काळे तीळ दान केले तर तुमची शनी दोष आणि राहु दोषातून मुक्तता होते. खर्चावर नियंत्रण येतं, आणि भविष्यात तुम्हाला ज्या आर्थिक समस्या येणार होत्या त्या देखील नष्ट होतात, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.
भांडण करू नका – वास्तुशास्त्रानुसार ज्या घरात सतत भांडणं होतात, काहीही कारण नसताना वाद होतात. अशा घरावर लक्ष्मी मातेची अवकृपा होते, अशा घरात कधीही पैसे टिकत नाहीत, त्यामुळे घरात शांतता ठेवा, घरात कधीही भांडणं करू नका. घर शांत असेल तर ऊर्जा संतुलन आपोआप साधलं जातं.
गंध लावा – वास्तुशास्त्रानुसार जर तुमच्या घरात पैसा जास्त खर्च होत असेल, तुम्ही खर्चावर नियंत्रण ठेवू शकत नसाल तर तुम्ही टिळा लावला पाहिजे, हा टिळा चंदनाच्या गंधाचा किंवा अष्टगंधाचा देखील लावता येऊ शकतो, यामुळे ऊर्जा संतुलन राखण्यास मदत होते असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)