Vastu Shastra : घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय, नकारात्मक ऊर्जा होईल झटक्यात नष्ट

वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये केवळ तुमच्या घराची वास्तुरचना कशी असावी याबद्दलच माहिती देण्यात आलेली नाहीये तर घरात जर वास्तुदोष निर्माण झाला असेल तर त्यावर देखील उपाय सांगण्यात आले आहेत. आज आपण अशाच काही उपायांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

Vastu Shastra : घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय, नकारात्मक ऊर्जा होईल झटक्यात नष्ट
Vastu Shastra
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 02, 2026 | 8:49 PM

हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्राला खूप महत्त्व आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार जेव्हा तुमच्या घराची रचना ही वास्तुशास्त्रात सांगितल्या प्रमाणे नसते, तेव्हा तुमच्या आयुष्यात विविध प्रकारच्या अडचणी येऊ शकतात. घरात वास्तुदोष निर्माण होतो. त्यामुळे आजही ज्यांचा वास्तुशास्त्रावर विश्वास आहे, असे अनेक लोक आपल्या घराची रचना ही वास्तुशास्त्राप्रमाणे करतात. मात्र तुमचं घर केवळ वास्तुशास्त्रात सांगितल्या प्रमाणे असून चालत नाही, तर तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात ज्या चुका करतात त्यामुळे देखील घरात वास्तुदोष निर्माण होतो. वास्तुशास्त्र हे सकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक ऊर्जा अशा दोन गोष्टींवर कार्य करतं. वास्तुशास्त्रानुसार जेव्हा तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होतो, तेव्हा नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. यामुळे तुमच्या आयुष्यात अनेक समस्या येऊ शकतात. तुम्हाला व्यवसायात तोटा होऊ शकतो, घरात काहीही कारण नसताना भांडणं होतात. आर्थिक संकट येतात. त्यामुळे घरातील वास्तुदोष दूर होणं गरजेचं असतं. त्यासाठी वास्तुशास्त्रात काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत, त्याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

सोमवार मंगळवारी करावयाचे उपाय – सोमवार आणि मंगळवारी कापूर आणि लवंग एकत्र करून जाळा, यामुळे तुमच्या घरातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल, जर तुम्हाला वारंवार आर्थिक समस्या येत असतील, तुम्ही पैसा प्रचंड कमवता मात्र तो हातात टिकत नसेल तर या उपायामुळे तुमची समस्या दूर होऊ शकते. तुमच्या सर्व प्रकारच्या आर्थिक समस्या या उपायामुळे दूर होतील असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

बुधवार गुरुवारी करावयाचे उपाय – जर तुमच्या घरामध्ये काहीही कारण नसताना सारखे भांडणं होत असतील, पती-पत्नीचं पटत नसेल तर त्यासाठी वास्तुशास्त्रात एक सोपा उपाय सांगितला आहे. दर बुधवारी आणि गुरुवारी एक तेजपत्ता आणि कापूर एकत्र जाळल्यास सर्व प्रकारचे दोष दूर होतात. घरातील वादविवाद कमी होण्यास मदत होते.

शुक्रवारी करायचे उपाय – शुक्रवार लक्ष्मी मातेचा वार असतो, या दिवशी लक्ष्मी मातेच्या मुर्ती समोर किंवा फोटो समोर कापूर लावून धन प्राप्तीसाठी प्रार्थना करावी, यामुळे लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुम्हाला मिळतो, आणि तुमची तिजोरी पैशांनी सदैव भरलेली राहते.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us