AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

20 वर्ष लिव्ह इनमध्ये राहिलेली मराठमोळी अभिनेत्री, अखेर 60 व्या वर्षी Facebook फ्रेंडसोबत संसार थाटणारी ‘ती’ कोण?

17 वर्षे लहान हिरोसोबत लिपलॉक, तिच्या टॉपलेस सीनमुळे उडालेली खळबळ... 20 वर्ष लिव्ह इनमध्ये राहिल्यानंतर ब्रेकअप... अखेर वयाच्या 60 व्या वर्षी अभिनेत्रीने Facebook फ्रेंडसोबत थाटला संसार... आज अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यामुळे कायम असते चर्चेत...

20 वर्ष लिव्ह इनमध्ये राहिलेली मराठमोळी अभिनेत्री, अखेर 60 व्या वर्षी Facebook फ्रेंडसोबत संसार थाटणारी 'ती' कोण?
| Updated on: Jun 18, 2026 | 12:20 PM
Share

प्रेमाला कोणतीच बंधनं नसतात… वयाचंही बंधन नसतं आणि कोणच्या परवानगीची देखील गरज नसते… हवी असते तर फक्त दोघांना एकमेकांची साथ… हे सत्य करुन दाखवलं आहे, एका मराठमोठ्या अभिनेत्रीने… सिनेविश्वात अभिनेत्री यशाच्या शिखरावर तर पोहोचली, पण तिच्या खासगी आयुष्याच्या चर्चा देखील तुफान रंगलेल्या आणि आजही अभिनेत्रीचं खासगी आयुष्य चर्चेत असते. अभिनेत्री स्वतःपेक्षा 17 वर्ष लहान अभिनेत्यासोबत किसिंग सीन तर दिलाच पण अभिनेत्रीच्या टॉपलेस सीने सर्वत्र खळबळ उडाली होती… एवढंच नाही तर, अभिनेत्री खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत आली. 20 वर्ष एका पुरुषासोबत राहिल्यानंतर अभिनेत्रीचं ब्रेकअप झालं. त्यानंतर अभिनेत्रीने एका फेसबूक फ्रेंडसोबतच लग्न केलं. सध्या ज्या अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर, अभिनेत्री सुहासिनी मुळे आहे. सुहासिनी ‘इक्किस’ सिनेमात दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांच्यासोबत देखील झळकले होते.

सुहासिनी यांच्या आई विजया मुळे एक फ्लिममेकर होत्या. ज्यामुळे सुहासिनी यांनी सिनेमात काम करण्याचा निर्णय घेतला. 1965 मध्ये जेव्हा सुहासिनी ‘पिअर्स’ (Pears) साबणाच्या जाहिरातीत झळकली, तेव्हा चित्रपट-दिग्दर्शक मृणाल सेन यांनी त्यांना पाहिलं आणि ‘भुवन शोम’ या सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारण्याची संधी दिली. त्यानंतर सुहासिनी यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही.

सुहासिनी मुळे यांसारख्या अभिनेत्रींची तेव्हा सर्वत्र चर्चा रंगलेली असायची. कायम तेव्हा अभिनेत्रीने अभिनेते नसीरुद्दीन शाह स्टारर ‘यूं होता तो क्या होता’ सिनेमात टॉपलेस सीन देत सर्वांना थक्क केलं होतं.. एवढंच नाही तर, सुहासिनी यांनी 17 वर्ष लहान इमरान खान यांच्यासोबत किसिंग सीन देखील दिलेला. त्याकाळात सुहासिनी अत्यंत ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखल्या जात होत्या.

मोठ्या पडद्यावर सुहासिनी यांनी चाहत्यांचं मनोरंजन तर केलं. पण खासगी आयुष्यात त्यांनी अनेक चढ – उतारांचा सामना केला. तेव्हा सुहासिनी तब्बल 20 वर्ष लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होत्या. तेव्हा अशा नात्यांना भारतीय समाजाचा नकार असायचा… पण 1990 च्या अखेरीस त्यांचे ब्रेकअप झालं, त्यानंतर सुहासिनी यांची ओळख अतुल गुर्तू याच्यासोबत फेसबुकवर झाली. त्यानंतर दोघांमध्ये गप्पा सुरु झाल्या. अखेर अतुल यांचा अभिनेत्रीला एक फोन आला, ‘नाती बनवायची असतात, ती आकाशातून पडत नाहीत.’

अतुल आणि सुहासिनी यांनी काही वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. एका मुलाखतीत सुबासिनी म्हणालेल्या, ‘जेव्हा पंडितने विचारल नवरी – नवरा कोण आहे… तेव्हा आम्हाला दोघांना पाहून ते हैराण झाले. आम्हाला देखील हसायला आलं… कोर्टामध्ये देखील असंच काही झालं… पण आम्ही आनंदी होतो…’, आज सुहासिनीमुळे 75 वर्षांच्या आहेत आणि त्यांच्या आयुष्यात आनंदी आहेत.

Follow Us
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला