AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : हे पाच आवाज आहेत खूपच शुभ, मिळतात मोठे संकेत, वास्तुशास्त्रात काय सांगितलंय?

काही विशिष्ट आवाज हे अत्यंत शुभ माण्यात आले आहेत. या आवाजातून तुम्हाला मोठे संकेत मिळत असतात. जर तुमच्या कानी हे ध्वनी पडले तर समजू जावे की तुमच्या प्रगतीला सुरुवात झाली आहे, तुमच्या सोबत चांगल्या घटना घडणार आहेत, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

Vastu Shastra : हे पाच आवाज आहेत खूपच शुभ, मिळतात मोठे संकेत, वास्तुशास्त्रात काय सांगितलंय?
vastu shastra Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 18, 2026 | 10:02 PM
Share

वास्तुशास्त्राला हिंदू धर्मशास्त्रामध्ये अत्यंत महत्त्व आहे. वास्तुशास्त्रानुसार जेव्हा तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा वाढते, तेव्हा सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होतो आणि घरात वास्तुदोषाची निर्मिती होते. तुमच्या घरात जर वास्तुदोष असेल तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही अडचणी येऊ शकतात, या अडचणी दूर करण्यासाठीच वास्तुशास्त्रामध्ये काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत. वास्तुशास्त्रानुसार जेव्हा तुमचा चांगला काळ सुरू होणार असतो, तेव्हा तुम्हाला काही विशिष्ट संकेत मिळत असतात, हे संकेत तुम्हाला ओळखता आले पाहिजेत, जसं की एखादं शुभ स्वप्न पडतं, किंवा विशिष्ट शुभ समजला जाणारा पक्षी, प्राणी अचानक दिसतो, एखादा शुभ आवाज कानी पडतो. पाच असे ध्वनी आहेत, ज्यांना वास्तुशास्त्रामध्ये अत्यंत शुभ माण्यात आले आहे. जर हे आवाज तुमच्या कानी पडले तर समजून जा तुम्ही ज्या कामासाठी निघाले आहात, ते तुमचं काम लवकरच पूर्ण होणार आहे, तुम्हाला एखादी आनंदाची बातमी मिळणार आहे. आज आपण अशाच पाच आवाजांबद्दल जाणून घेणार आहोत.

लहान मुलांच्या हसण्याचा आवाज – वास्तुशास्त्रानुसार ज्या घरात लहान मुलांच्या हसण्याचा आवाज येतो, ते घर सुख, शांती आणि समृद्धीने भरून जातं. अशा घरात कशाचीही कमी नसते, घराला बरकत प्राप्त होते. सदैव आनंदी वातावरण असतं, असं वास्तुशास्त्रात म्हटलं आहे.

गायीचा आवाज – वास्तुशास्त्रानुसार तुम्ही एखादं महत्वाचं काम करण्यासाठी घरातून बाहेर पडला आहात आणि तुम्हाला जर गायीच्या हंबरण्याचा आवाज आला तर समजून जा हा तुमच्यासाठी अत्यंत शुभ संकेत आहे, तुम्ही ज्या कामासाठी घरातून बाहेर पडला आहात, ते काम आला लवकरच पूर्ण होणार आहे.

मंदिरातील घंटीचा आवाज – वास्तुशास्त्रानुसार जेव्हा तुमच्या कानावर मंदिरातील घंटीचा आवाज पडतो, तो आवाज अत्यंत शुभ असतो, विशेष: जेव्हा तुम्ही सकाळी झोपेतून उठता आणि मंदिरातील घंटीचा आवाज तुमच्या कानावर पडतो, तेव्हा तुमचा संपूर्ण दिवस चांगला आणि सकारात्मक जातो.

शंखनाद – वास्तुशास्त्रामध्ये शंखाला अत्यंत महत्त्व आहे. प्रत्येक देवघरात शंख असावा असं वास्तुशास्त्र सांगतं. जर तुमच्या कानावर शंखनाद पडला तर ते तुमच्यासाठी शुभ संकेत असतात. तुमची जी अडलेली महत्त्वाची कामे आहेत, ती आता लवकरच मार्गी लागणार आहेत, याचे ते संकेत असतात.

कोकीळेचा आवाज – कोकीळेचा आवाज हा खूप मधुर असतो, कोकीळेचा आवाज कानावर पडणं हे शुभ मानलं जातं. यामुळे दिवसाची सुरुवात चांगली होती.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
काल आलेला पोरगा काहीतरी बोलतो आणि आपण आंदोलन करतो...
Ravindra Chavan | काल आलेला पोरगा काहीतरी बोलतो आणि आपण आंदोलन करतो; रवींद्र चव्हाणांचा भाजप युवा मोर्चाला खडेबोल
साखरेची साठा मर्यादा निम्म्यावर, 15 सप्टेंबरपासून नवा नियम लागू
Sugar | साखर व्यापाऱ्यांना केंद्राचा मोठा झटका! साखरेची साठा मर्यादा निम्म्यावर, 15 सप्टेंबरपासून नवा नियम लागू
जरांगेंच्या भेटीला जिल्हाधिकारी-एसपी, पण तोडगा नाहीच; अधिकारी नको...
Manoj Jarange | जरांगेंच्या भेटीला जिल्हाधिकारी-एसपी, पण तोडगा नाहीच; अधिकारी नको, सरकारी शिष्टमंडळ पाठवा!
शाळकरी मुलांना आता वडापाव-समोसा बंद!; बबन वडापावने घेतला मोठा निर्णय!
FDA | शाळकरी मुलांना आता वडापाव-समोसा बंद!; FDAच्या आदेशानंतर अंबरनाथमधील बबन वडापावने घेतला मोठा निर्णय!
मृत्यू समोर दिसत होता... पण नववधूने ओढणी फेकली अन् दुचाकीस्वाराचा...
मृत्यू समोर दिसत होता... पण नववधूने ओढणी फेकली अन् दुचाकीस्वाराचा जीव वाचवला, व्हिडिओ बघाच!
सुप्रीम कोर्टातील सुनावणीआधी शिंदेंची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले...
Eknath Shinde | सुप्रीम कोर्टातील सुनावणीआधी शिंदेंची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, बाळासाहेबांना हे चिन्ह...
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ...
शिवसेना पक्षचिन्हावर उद्या सुनावणी; एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल
शिवसेना चिन्हाच्या सुनावणीपूर्वी एकनाथ शिंदे दिल्लीत; म्हणाले, धनुष्यबाण गोठवणे दुर्दैवी
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन