Vastu Shastra : या चार चुका वाटतात साध्या, पण घरात निर्माण होतो भयंकर वास्तुदोष, पैसा हातात टिकतच नाही
हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्राला प्रचंड महत्त्व आहे. अनेकदा आपण अशा काही चुका करतो, ज्या आपल्याला साध्या वाटतात. परंतु त्यामुळे घरात भयंकर वास्तुदोष निर्माण होतो. हातात पैसा टिकत नाही, तसेच त्यामुळे घरात भांडणं देखील होतात. आज आपण अशाच काही चुकांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्राला प्रचंड महत्त्व आहे. जर तुमच्या घराची रचना ही वास्तुशास्त्राप्रमाणे नसेल तर तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होऊ शकतो, असं हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. ज्या घरात वास्तुदोष निर्माण होतो, त्या घरात विविध समस्या निर्माण होतात, जसं की, काहीही कराण नसताना अचानक कुटुंब प्रमुखाचे घरातील सदस्यांसोबत भांडणं होऊ लागतात, पती-पत्नीचं देखील पटत नाही. घर सतत अशांत राहतं, ज्याचा परिणाम हा तुमच्या आर्थिक स्थितीवर होतो. तुम्ही कितीही पैसा कमावला तरी तो तुमच्या हातात टिकत नाही. त्यासाठी घरातील वास्तुदोष दूर करणं गरजेंच असतं. आपण घरामध्ये अशा काही चुका करत असतो, ज्या आपल्याला किरकोळ वाटतात. मात्र त्यामुळे तुमच्या घरात नकारात्मक शक्ती स्टोअर होत असते, ज्याचा परिणाम हा तुमच्या प्रगतीवर होतो. सगळं सुरळीत सुरू असताना अचानक तुमच्या प्रगतीला ब्रेक लागतो, आर्थिक नुकतान होतं. आज आपण या चुकांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. तुम्ही जर या चुका टाळल्या तर तुमच्या घरातील वास्तुदोष दूर होईल, आणि तुम्हाला आर्थिक स्थैर्याची प्राप्ती होईल, चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्रात नेमकं काय सांगितलं आहे? त्याबद्दल.
रात्री जेवणानंतर घरात खरकटी भांडी तशीच ठेवणे – अनेक जण रात्री जेवणानंतर भांडी स्वच्छ न करता तशीच खरकटी भांडी स्वयंपाक घरात पडू देतात. ही गोष्टी तशी पाहिली तर सामान्य आहे. परंतु यामुळे तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होतो. घराला बरकत प्राप्त होत नाही, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.
पलंगावर जेवणे – अनेकांना पलंगावर जेवण्याची सवय असते, परंतु वास्तुशास्त्रानुसार कधीही पलंगावर जेवू नये, त्यामुळे अन्नपूर्णा माता नाराज होते. घरात वास्तुदोष निर्माण होतात. आयुष्यात कायम आर्थिक संकट येतात, तुम्ही कितीही कष्ट केले तरी हातात पैसा टिकत नाही, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.
देवघरात एकाच देवतेच्या एका पेक्षा अधिक मूर्ती – वास्तुशास्त्रानुसार देवघरात प्रत्येक देवतेची एकच मूर्ती असावी, एकापेक्षा अधिक मूर्ती असू नये, यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा तयार होते, ज्याचा परिणाम हा तुमच्या घरावर होऊ शकतो. त्यामुळे देवघरात एका देवतेची एकच मूर्ती असावी असा सल्ला वास्तुशास्त्रात देण्यात आला आहे.
झोपण्याची पद्धत – वास्तुशास्त्रानुसार कधीही दक्षिणेकडे पाय करून झोपू नये, यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो. ज्याचा परिणाम हा थेट तुमच्या आरोग्यावर होतो, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)