
प्रत्येक व्यवसायिकाची इच्छा असते की आपला व्यवसाय चांगला चालला पाहिजे, व्यवसायामध्ये जास्तीत जास्त नफा मिळाला पाहिजे. व्यवसायामध्ये आपण जे कष्ट करतो, त्या कष्टाचं अपेक्षित फळ मिळालं पाहिजे, दुकानात सतत ग्राहकांची गर्दी राहिली पाहिजे, तर यासाठी वास्तुशास्त्रामध्ये काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत. अनेकदा असं होतं की आपण व्यवसाय तर सुरू करतो, मात्र आपल्याला त्या व्यवसायात विशेष जम बसवता येत नाही, तर अनेकदा असं होतं की आपला व्यवसाय सुरळीत सुरू असतो, मात्र अचानक आपल्याला त्यामध्ये मोठा फटका बसतो, आपलं मोठं नुकसान होतं. यासाठी वास्तुदोष देखील कारणीभूत असू शकतो. वास्तुशास्त्रानुसार अशा काही गोष्टी आहेत, ज्या तुमच्या दुकानासमोर असू नयेत, त्याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहेत.
अंधार – वास्तुशास्त्रानुसार तुमचं दुकान कधीही अंधाऱ्या भागात असू नये, त्यामुळे लक्ष्मी मातेची अवकृपा होते, आणि व्यवसायात तुम्हाला नुकसान होऊ शकतं. जरी तुम्हाला व्यवसायातून पैसा मिळाला तरी देखील तो तुमच्या हातात टिकत नाही, त्यामुळे तुमच्या दुकानाचा समोरचा भाग हा नेहमी स्वच्छ सूर्य प्रकाशातच असावा.
तीव्र उतार – तुमच्या दुकानासमोर तीव्र उतार असू नये, वास्तुशास्त्रानुसार हा एक मोठा वास्तुदोष मानला जातो. जर तुमच्या दुकानासमोर तीव्र उतार असेल तर तुमच्या दुकानात नेहमी नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते, ज्यामुळे त्याचा परिणाम हा तुमच्या व्यवसायावर होतो, तुम्हाला व्यवसायात अपेक्षित यश मिळत नाही, हातात पैसा टिकत नाही.
विजेचा खांबा – वास्तुशास्त्रानुसार तुमच्या दुकानाच्या समोर कधीही विजेचा खांबा असू नये, त्यामुळे तुमच्या दुकानात नेहमी नकारात्मक ऊर्जा राहते, दुकानात नकारात्मक ऊर्जा निर्माण झाल्यास त्याचा परिणाम हा तुमच्या व्यवसायावर होतो.
तिजोरी – तुमच्या दुकानातील तिजोरी ही नेहमी उत्तर दिशेला ठेवा, कारण उत्तर दिशा ही धनाची दिशा असते, तसेच ती धनाचे देवता कुबेर यांची देखील आवडती दिशा आहे, त्यामुळे सदैव तुमची तिजोरी पैशांनी भरलेली राहीलं.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)