Vastu Shastra : घराच्या मुख्य दरवाजासमोर कधीच असू नयेत ही तीन झाडं, आयुष्य उद्ध्वस्त होतं
वास्तुशास्त्रामध्ये काही झाडांना अत्यंत शुभ माण्यात आलं आहे, तर काही झाडांना अशुभ माण्यात आलं आहे. वास्तुशास्त्रामध्ये ज्या झाडांना अशुभ माण्यात आलं आहे , ती झाडं घरात लावल्यास त्याचा नकारात्मक परिणाम तुमच्यावर होऊ शकतो, आज आपण अशाच तीन झाडांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

वास्तुशास्त्रामध्ये काही मूर्ती, फोटो, तसेच झाडांना अत्यंत शुभ माण्यात आलं आहे, जेव्हा या गोष्टी तुमच्या घरात असतात, तेव्हा सातत्याने तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जेची निर्मिती होत राहते आणि घरातील नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होतो. याचा खूपच शुभ परिणाम हा तुमच्या करिअरवर होतो, तसेच तुमच्या आर्थिक प्राप्तीच्या मार्गातील सर्व प्रकाचे अडथळे दूर होतात. घरात सुख, शांती आणि समृद्धी येते, असं वास्तुशास्त्रात म्हटलं आहे. परंतु अशी देखील काही झाडं असतात, जी घराच्या मुख्य दरवाजासमोर असणं हे अशुभ माण्यात आलं आहे. ही झाडं जर तुमच्या घराच्या मुख्य दरवाजासमोर असतील तर त्यामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं, कारण त्यामुळे घरात सातत्याने नकारात्मक ऊर्जा राहाते, ज्याचा परिणाम हा त्या घरातील कुटुंबप्रमुखासह इतर सदस्यांवर होतो. आज आपण अशाच तीन झाडांबद्दल माहिती जाणून घेणार आहे, जी की वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाजवळ असता कामा नये.
शेवग्याचं झाड – वास्तुशास्त्रानुसार शेवग्याचं झाड हे तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाजवळ असता काम नये, कारण त्यामुळे तुमच्या महत्त्वाच्या कामांमध्ये नेहमी अडथळे निर्माण होतात. तसेच घरात पैसा टिकत नाही, एवढंच नाही तर घरात काहीही कराण नसताना अचानक वाद विवादला सुरुवात होते, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.
केळीच झाडं – केळीच्या झाडाला वास्तुशास्त्र तसेच हिंदू धर्मशास्त्रामध्ये अत्यंत पवित्र मानलं गेलं आहे, कारण धार्मिक कार्यक्रमा प्रसंगी जेवणासाठी केळीच्याच पानाचा वापर केला जातो. एवढंच नाही तर देवाला केळीचा नवैद्य दाखवला जातो. परंतु जरी असं असलं तरी देखील केळीचं झाडं हे कधीही मुख्य दरवाजाजवळ असता कामा नये, असं वास्तुशास्त्र सांगतं.
चिंचेच झाडं – वास्तुशास्त्रानुसार चिंचेच झाडं देखील कधीही तुमच्या घराच्या मुख्य दरवाजासमोर असू नये, यामुळे अनेक अडचणी तुमच्या आयुष्यात येऊ शकतात.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)