Vastu Shastra : कर्जातून सुटका पाहिजे? आर्थिक संकट येतायेत? मग करा हे सोपे उपाय

अनेकांसोबत असं होतं की ते खूप कष्ट करतात, प्रचंड पैसा कमावतात. परंतु हा पैसा हातात टिकत नाही. डोक्यावरचं कर्ज कमी होण्याऐवजी वाढतच जातं. अशा समस्यांवर वास्तुशास्त्रात काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत, त्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.

Vastu Shastra : कर्जातून सुटका पाहिजे? आर्थिक संकट येतायेत? मग करा हे सोपे उपाय
VASTUSHTRA
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 16, 2026 | 7:42 PM

आर्थिक समस्या आणि वाढत जाणारं कर्ज ही आजच्या काळात एक गंभीर समस्या बनली आहे. अनेक लोक सध्याच्या काळात या समस्येचा सामना करत आहेत. सर्वांचीच इच्छा असते, की कर्जातून आपली लवकर सुटका व्हावी, आपल्या घराला आर्थिक स्थैर्य प्राप्त व्हावं, मात्र तशी इच्छा असून देखील हे घडत नाही. वास्तुशास्त्रानुसार जेव्हा तुमच्याबाबतीमध्ये असं घडतं तेव्हा त्यामागे तुमच्या घरात निर्माण झालेला वास्तुदोष आणि खराब ग्रहस्थिती असू शकते. जर तुमच्या कुंडलीमध्ये काही ग्रह हे कमजोर आणि अशुभ असतील तर तुमच्या आयुष्यात आर्थिक समस्या येण्यास सुरुवात होते. तुम्ही कितीही पैसा कमावला तरी तो तुमच्या हातात टिकत नाही. अशी स्थिती निर्माण होऊ नये, यासाठी वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रामध्ये काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत, त्याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहेत.

कर्ज आणि ग्रहांचा संबंध

ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ ग्रह आणि राहु ग्रह या दोन ग्रहांचा संबंध हा कर्जाशी असतो. यासोबतच गुरु ग्रह देखील याला कारणीभूत असू शकतो. गुरु ग्रहाला धन आणि यशाचं प्रतिक मानलं जातं. मात्र जर गुरु ग्रहच तुमच्या कुंडलीमध्ये कमजोर असेल तर तुम्हाला कोणत्याही कामात यश मिळत नाही, तसेच तुम्ही कितीही पैसे कमवा ते तुमच्या हातात टिकत नाहीत. तुमच्यावरील कर्ज वाढत जातं, तसेच तुम्हाला तुमच्या आयुष्यात आर्थिक समस्या येण्यास सुरुवात होते. आयुष्यात अशा समस्या येऊ नयेत, यासाठी ग्रहांचं संतुलन महत्त्वाचं असतं, त्याच संदर्भातील उपाय आज आपण जाणून घेणार आहोत.

उपाय

जर तुमच्या कुंडलीमध्ये गुरू ग्रह कमजोर असेल आणि त्यामुळे तुम्हाला आर्थिक अडचणी येत असतील तर तुम्ही गुरु ग्रहाला मजबूत करण्यासाठी दर गुरुवारी पिवळे वस्त्र किंवा गूळ, हळद आणि हारभाऱ्याची डाळ दान करा, यामुळे तुमच्या कुंडलीमधील गुरू ग्रह मजबूत होईल. जर तुम्हाला वारंवार आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असेल, घरात आर्थिक स्थैर्य लाभत नसेल तर तुम्ही दर गुरुवारी भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता यांची पूजा केली पाहिजे, त्यामुळे तुमच्यावरील सर्व आर्थिक संकट दूर होतील, तुमच्या घराला आर्थिक स्थैर्य लाभेल, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

 

 

Follow Us