Vastu Tips : घराला लावलेलं आंब्यांच्या पानांचं तोरण किती दिवसांनी काढावं? अनेक जण करतात ही मोठी चूक

हिंदू धर्मामध्ये अनेक सणांना आणि शुभकार्याच्या प्रसंगी घराला तोरण लावण्याची परंपरा आहे, हे तोरण एक तर आंब्यांच्या पानांचं किंवा झेंडूंच्या फुलांचं असतं, मात्र ते घराच्या दरवाजावरून कधी काढावं हे अनेकाना माहिती नसतं, त्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो.

Vastu Tips : घराला लावलेलं आंब्यांच्या पानांचं तोरण किती दिवसांनी काढावं? अनेक जण करतात ही मोठी चूक
| Updated on: Oct 09, 2025 | 9:10 PM

हिंदू धर्मामध्ये अनेक सण आहेत, प्रत्येक सण साजरा करण्याची एक वेगळी प्रथा, परंपरा आहे. मात्र या सर्वांमध्ये एक कॉमन गोष्ट म्हणजे सण कोणताही असो, दिवाळी, दसरा, गुढीपाडवा अशा अनेक महत्त्वाच्या सणांना आपण आपल्या घराला तोरण बांधतो, हे तोरण एक तर आंब्यांच्या पानांचं असंत किंवा झेडूंच्या फुलांचं. घराच्या दरवाजाला तोरण बांधणं हे हिंदू धर्मामध्ये खूप शुभ मानलं जातं. त्याचे अनेक फायदे आहेत, घराच्या दरवाजाला जर आंब्यांच्या पानांचं तोरण असेल तर घरात येणारी नकारात्मक ऊर्जा कमी होती.

वास्तुशास्त्रानुसार घराला आंब्यांच्या पानांचं तोरण लावण्याचे अनेक फायदे आहेत, घराला आंब्यांचे तोरण बांधणं शुभ मानलं जातं. हिंदू धर्मानुसार आंब्यांच्या पानांना खूपच शुभ मानलं गेलं आहे. आंब्यांचे पानच नाही तर आंब्याच्या लाकडाचा उपयोग देखील अनेक शुभकार्यात केला जातो. हिंदू धर्मामध्ये धार्मिक कार्याच्या प्रसंगी जो होम हवन केला जातो, त्यामध्ये समिधा म्हणून आंब्यांच्या लाकडाचा उपयोग होतो. मात्र आता अनेकांच्या मनात असा देखील प्रश्न असतो की, आपण एखाद्या शुभ प्रसंगी जे घराला आंब्यांचं तोरण लावतो ते किती दिवस ठेवायचं? त्याचबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

वास्तुशास्त्रानुसार तुम्ही तोरणामध्ये आंब्याची जी पानं वापरली आहेत, ती सुकल्यानंतर लगेचच हे तोरण काढून टाकलं पाहिजे. मात्र अनेकजण तोरणाची पान वाळल्यानंतर देखील अनेक महिने हे तोरण आपल्या दरवाजावर तसंच ठेवतात, मात्र वास्तुशास्त्रानुसार हे अशुभ मानण्यात आलं आहे, घराच्या मुख्य दरवाजावर सुकलेल्या पानाचं तोरण नसावं असं वास्तुशास्त्र सांगतं, त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, आणि त्याचा परिणाम हा तुमच्यावर होतो. वास्तुशास्त्रानुसार 12 ते 15 दिवसांमध्ये हे तोरण घराच्या दरवाजावरून काढलं पाहिजे. मात्र अनेकजणांना अशी सवय असते की एका सणासाठी लावलेलं तोरण हे थेट दुसऱ्या सणालाच दरवाजावरून काढलं जातं, त्या जागी नवं तोरण लावलं जातं. मात्र त्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो, असं वास्तुशास्त्र सांगतं.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)