वास्तूनुसार घरात किती आरसे असायला हवेत, तुमच्या घरात आहेत इतके आरसे?

एखादा तरी आसरा प्रत्येकाच्या घरात असतोच... रोजच्या वापरातील या आरशाचं देखील हिंदू धर्मात फार मोठं महत्त्व आहे. पण घरात किती आरसे असले पाहिजे याबद्दल देखील शास्त्रात सांगण्यात आलं आहे... तर जाणून घ्या शास्त्र काय सांगतं...

वास्तूनुसार घरात किती आरसे असायला हवेत, तुमच्या घरात आहेत इतके आरसे?
| Updated on: Aug 14, 2026 | 2:38 PM

अनेक जण घर सजवण्यासाठी विविध सुंदर वस्तू आणतात. पण घरात किती आरसे असले पाहिजे याबद्दल देखील वास्तूमध्ये सांगण्यात आलं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, घरात आरसे आवश्यक असतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की किती आरसे लावावेत आणि कोणत्या दिशेला? वास्तुशास्त्रानुसार, आरशांना केवळ सजावट किंवा प्रतिबिंबाचे साधन मानलं जात नाही, तर ते घराच्या ऊर्जेशी देखील जोडलेले आहेत. त्यामुळे घरात किती आरसे असायला हवेत याबद्दल तुम्हाला माहिती असलं पाहिजे…

वास्तुशास्त्रानुसार, गरजेपेक्षा जास्त आरसे लावणं टाळळं पाहिजे. मान्यतेनुसार, दोन आरसे पुरेसे मानले जातात. एक पूर्वेला आणि दुसरा उत्तरेला ठेवता येतो. उत्तर दिशा संपत्ती आणि समृद्धीशी संबंधित आहे, तर पूर्व दिशा सकारात्मक ऊर्जेशी संबंधित आहे. मात्र, आरसे ठेवताना त्यांची स्थिती आणि त्यातील प्रतिबिंब विचारात घेणं महत्त्वाचं आहे.

जर दोन आरसे एकाच दिशेत ठेवायचे असतील, तर ते एकमेकांसमोर किंवा खूप जवळ ठेवणं टाळा. यामुळे ते एकमेकांचे प्रतिबिंब दाखवू शकतात. मान्यतेनुसार, यामुळे घरातील ऊर्जेमध्ये असंतुलन निर्माण होऊ शकते. बेडरूममध्ये आरसा लावताना विशेष काळजी घेणं उचित आहे. झोपताना आरशात पलंग किंवा शरीराचं प्रतिबिंब दिसणार नाही याची काळजी घ्यावी. जर हे शक्य नसेल, तर रात्री आरसा झाकून ठेवावा. वास्तूनुसार, पलंगाच्या प्रतिबिंबाचा झोपेवर आणि वैवाहिक संबंधांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

बाथरूममध्येही खूप जास्त आरसे लावणं टाळलं पाहिजे. एकच आरसा पुरेसा मानला जातो. शिवाय, आरसा नेहमी स्वच्छ आणि तडे गेलेला असावा. वास्तूनुसार, स्वच्छ आणि योग्य ठिकाणी लावलेले आरसे सर्वोत्तम मानले जातात वास्तूनुसार, मुख्य दरवाजासमोर थेट आरसा लावणं टाळलं पाहिजे. असं मानलं जातं की, यामुळे बाहेरून घरात येणारी सकारात्मक ऊर्जा परावर्तित होऊ शकते. मात्र, आपण दरवाजालगतच्या भिंतीवर आरसा लावू शकता. वास्तूनुसार हे शुभ मानलं जातं. असं देखील म्हटलं जातं की, यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो. मात्र, दरवाजासमोर थेट आरसा लावणे टाळावे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us