
हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्राला खूप महत्त्व आहे. वास्तुशास्त्रामध्ये एक परिणूर्ण घर कसं असावं या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आलं आहे. अशी मान्यता आहे की, जर तुमचं घर हे वास्तुशास्त्रानुसार नसेल तर तुम्हाला भविष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे अनेकजण आपलं घर बांधताना किंवा विकत घेताना त्याची रचना ही वास्तुशास्त्रानुसार आहे की नाही? हे पाहातात आणि त्यानंतरच घर खरेदीचा निर्णय घेतात.
वास्तुशास्त्रामध्ये तुमच्या घराची रचना कशी असावी? घराचा मुख्य दरवाजा कसा असावा? त्याची दिशा कोणती असावी? तुमचं स्वयंपाक घर कोणत्या दिशेला असावं? बेडरूम कोणत्या दिशेला असावी? अशा अनेक गोष्टींचं मार्गदर्शन करण्यात आलं आहे. यासोबतच तुमच्या घरामध्ये असलेल्या वस्तुंची दिशा कोणती असावी हे देखील वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे, यामध्ये तुमच्या घराची तिजोरी कोणत्या दिशेला असावी? तुम्ही जर घरात काही प्रतिमा लावल्या असतील तर त्याची दिशा कोणती असावी अशा अनेक गोष्टी वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आल्या आहेत.
दरम्यान अशा काही गोष्टी आहेत, ज्या घरामध्ये असल्यास तुमच्या घरात नेहमी नकारात्मक ऊर्जा राहाते, परिणामी त्यामुळे तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं असं वास्तुशास्त्रामध्ये म्हटलं आहे, त्या गोष्टी कोणत्या आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत.
कचरा – जर तुमच्या घरात कचरा असेल तर त्यामुळे तुमच्यावर माता लक्ष्मीची अवकृपा होते, त्यामुळे तुमची धन हानी होऊ शकते.
अस्त व्यस्त पडलेल्या वस्तू – जर तुमच्या घरात नेहमीच पसारा पडलेला असेल तर त्यामुळे तुमच्या घरात एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा तयार होते, त्यामुळे घरात प्रसन्न वाटत नाही.
सुखलेलं झाडं – वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये कधीही सुखलेली झाडं नसू नयेत, त्यामुळे घरात नकरात्मक ऊर्जा निर्माण होते, तसेच अशी झाडं प्रगतीमधील अडथळा देखील मानले जातात.
तुटलेल्या वस्तू – वास्तुशास्त्रानुसार घरात कधीच तुटलेल्या वस्तू असू नयेत, त्यामुळे घरात एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
जाळे – वास्तुशास्त्रानुसार घराची नियमित स्वच्छता करणं आवश्यक आहे, जर तुमच्या घरात भिंतीला छताला जाळे असतील तर त्यामुळे तुमच्या घरात एक प्रकारीच नकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही