
हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्राला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. वास्तुशास्त्र हे असं शास्त्र आहे, ज्यामध्ये केवळ तुमचं घर कसं असावं हेच सांगितलं जात नाही तर तुम्ही तुमच्या घरात ज्या वस्तू ठेवता, त्या वस्तू कोणत्या दिशेला ठेवाव्यात? घरामध्ये काय असावं? काय असू नये? याबद्दल देखील मार्गदर्शन केलेलं आहे. अनेक जण नवं घर बांधताना किंवा विकत घेताना ते वास्तुशास्त्राच्या कसोट्यांवर तपासून पाहातात, म्हणजे त्या घराच्या मुख्य दरवाजाची दिशा कोणती आहे? स्वयपांक घर कोणत्या दिशेला आहे? बेडरूम कोणत्या दिशेला आहे? अशा अनेक गोष्टी विचारात घेतल्या जातात. मात्र तुमचं घर जर वास्तुशास्त्रानुसार असेल पण तुमच्या घरातील वस्तू या चुकीच्या दिशेला ठेवलेल्या असतील, त्या जर वास्तुशास्त्राप्रमाणे नसतील तरी देखील तुम्हाला अडचणी येऊ शकतात.
वास्तुशास्त्रामध्ये असे अनेक उपाय सांगितलेले आहेत, ज्याचं पालन केल्यास तुमच्या आयुष्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या आर्थिक अडचणी दूर होऊन, तुमच्यावर सदैव माता लक्ष्मीची कृपा राहाते आज आपण त्यातीलच एका उपयाबाबत जाणून घेऊयात. तुमच्या पाकिटात कोणत्या गोष्टी ठेवू नये याबाबत देखील वास्तुशास्त्रात मार्गदर्शन करण्यात आलं आहे.
फाटलेल्या नोटा – वास्तुशास्त्रानुसार तुमच्या पाकिटामध्ये फाटलेल्या नोटा नसाव्यात अनेकजण या फाटलेल्या नोटा आपल्या पाकिटात जपून ठेवतात, मात्र यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तुम्हाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
धातुच्या वस्तू – तुमच्या पाकिटामध्ये धातुच्या अनावश्यक वस्तु नसाव्यात असं वास्तुशास्त्र सांगतं यामुळे सकारात्मक ऊर्जेचा स्त्रोत रोखला जातो. तुम्हाला आर्थिक अडचणी येऊ शकतात. पैशांची कमतरता भासते.
मृत व्यक्तीचा फोटो – वास्तुशास्त्रानुसार तुमच्या पाकिटमध्ये ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, अशा व्यक्तीचा फोटो असता कामा नये, यामुळे एक विशिष्ट प्रकारची नकारात्मक ऊर्ज तयार होते. तुम्हाला त्यामुळे अडचणी येऊ शकतात.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)