झाडूच्या चुकीच्या वापराने घरात येईल दारिद्रय, तुम्ही पण करत आहात त्याचं चुका?
वास्तु टिप्स: झाडू योग्य दिशेने ठेवला आणि योग्यरित्या वापरला तर भरपूर आर्थिक लाभ होऊ शकतो. पण काही चुका दारिद्रयही आणतात. त्यामुळे झाडू मारताना किंवा वापरताना या चुका नक्की करू नका.

वास्तु टिप्स: घरात अशा अनेक गोष्टी असतात जे आपण अगदी रोजच्या आयुष्यात त्याचा उपयोग करत असतो. पण काहीवेळेला त्या वस्तूंच्या चुकीच्या वापरामुळे घरात आर्थिक चणचण भासू शकते. त्यातीलच एक आहे झाडू. झाडू हे देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते आणि त्याचा योग्य वापर आपल्या जीवनात आनंद आणि समृद्धी आणू शकतो. झाडू योग्य दिशेला ठेवला आणि योग्यरित्या वापरला तर आर्थिक लाभ होऊ शकतो. पण चुकीच्या पद्धतीने वापरला तर दरिद्रता येऊ शकते.
घरात झाडू कुठे ठेवावा, त्याचा योग्य वापर कधी करावा आणि कोणत्या दिवशी तो खरेदी करणे किंवा फेकून देणे शुभ आहे.या सर्वांबद्दल जाणून घेऊयात. जेणे करून या चुका टाळता येतील.
* झाडू नेहमी एका कोपऱ्यात किंवा दाराच्या मागे लपवून ठेवावा, जेणेकरून बाहेरील कोणीही तो पाहू शकणार नाही. ते उघड जागी ठेवणे अशुभ मानले जाते. झाडू चुकूनही ईशान्य दिशेला ठेवू नये, कारण त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येणार नाही. याशिवाय, पूजागृहात झाडू ठेवणे देखील अशुभ मानले जाते, कारण त्यामुळे पूजास्थळाच्या पावित्र्यावर परिणाम होऊ शकतो. असं म्हणतात.
*सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतर झाडू मारणे अशुभ मानले जाते कारण ते घरात नकारात्मक ऊर्जा आकर्षित करते. रात्री झाडू मारल्याने गरिबी आणि आर्थिक समस्या वाढू शकतात. जर रात्री झाडू मारणे आवश्यक असेल तर कचरा घरात ठेवा आणि सूर्यास्तानंतर तो बाहेर फेकून द्यावा. या उपायाने घरात शांती राहते आणि दिवसाची सुरुवात सकारात्मक उर्जेने होते.
*वास्तुशास्त्रानुसार झाडू पलंगाखाली ठेवू नये. असे केल्याने घरातील अन्नधान्याचे नुकसान होऊ शकते आणि आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. पलंगाखाली झाडू ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा पसरते, ज्यामुळे घरात सुख-शांतीचा अभाव निर्माण होऊ शकतो. म्हणूनच झाडू नेहमी योग्य ठिकाणी ठेवावा.
( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
