Vastu Tips : घरात पैसा टीकत नाही? मग रात्री झोपण्यापूर्वी हे तीन सोपे उपाय कराच
वास्तुशास्त्रामध्ये असे काही उपाय सांगण्यात आले आहेत, ज्याचा उपयोग हा आपल्याला दैनंदीन जीवनात होतो, अशेच काही सोपे उपाय आपण आज जाणून घेणार आहोत, ज्यामुळे तुमच्या आर्थिक समस्या दूर होण्यास मदत होईल.

वास्तुशास्त्राला हिंदू धर्मामध्ये प्रचंड महत्त्व आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार जर तुमच्या घरात वास्तुदोष असेल किंवा तुमच्या घराची रचना ही वास्तुशास्त्राप्रमाणे नसेल, घरात काही चुकीच्या गोष्टी ठेवल्या असतील तर तुम्ही कितीही मेहनत करा, तुम्हाला अपेक्षित यश मिळणार नाही, कायम तुमच्या कामामध्ये काही न काही अडथळे निर्माण होत राहतील, अडचणी येतील, हातात पैसा टिकणार नाही. या सर्व समस्या दूर करण्यासाठी घरातील वास्तुदोष नष्ट होणे गरजेचे असते, घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये अनेक उपाय सांगण्यात आले आहेत, त्यातीलच एका उपायाबद्दल आपण आज माहिती जाणून घेणार आहोत. वास्तुशास्त्रानुसार तीन अशी कामे आहेत, जी तुम्ही रोज रात्री झोपण्यापूर्वी आवश्य केली पाहिजेत, त्यामुळे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. वास्तुदोष दूर होतो. घरामध्ये पैशांची आवक वाढते.
झोपण्यापूर्वी घराच्या मुख्य दरवाजाची स्वच्छता – वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घराचा मुख्य दरवाजा हा ऊर्जेचा सर्वात मोठा स्त्रोत आहे. याच दरवाजातून सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात प्रवेश करत असते. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी घराच्या मुख्य दरवाजाची स्वच्छता करावी, त्यामुळे घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा राहाते, माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतो. घराच्या मुख्य दरवाजाजवळ जर कचरा पडलेला असेल, घराचा मुख्य दरवाजा जर अस्वच्छ असेल तर त्यामुळे घरात येणाऱ्या सकारात्मक ऊर्जेला अडथळा निर्माण होतो, त्यामुळे झोपण्यापूर्वी घराच्या मुख्य दरवाजाची स्वच्छता करावी.
देवाला वाहिलेली फुलं – तुम्ही सकाळी देवाची पूजा केल्यानंतर त्यांना फूलं अर्पण करतात, मात्र ही फूलं दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत तशीच ठेवू नका, तर सायंकाळी देवाची आरती केल्यानंतर ती फूलं निर्माल्यात टाकून द्या. त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहाते, कामातील अडथळे दूर होतात असं वास्तुशास्त्र सांगतं.
जर तुम्हाला शांत झोप लागत नसेल, काही समस्या असतील, मनाला शांती मिळत नसेल तर संध्याकाळी झोपण्यापूर्वी तुमच्या घरात असलेल्या देवघरासमोर कापूर आणि लवंग एका पात्रामध्ये घेऊन एकत्र पेटवा, त्यामुळे घरातील वातावरण शुद्ध होते, तुमच्या मनात सुरू असलेले नकारात्मक विचार दूर होतात. शांत झोप लागते, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
