
अनेकदा खूप कष्ट करून देखील आपल्या हातात पैसा राहत नाही, नेहमीच पैशांची अडचण जाणवते, अचानक एखादं मोठं संकट येत आणि आपल्याजवळ असलेला सर्व पैसा खर्च होऊ जातो, आपण याला आपल्या कर्माचा दोष समजतो. मात्र अनेकदा त्यासाठी तुमच्या घरात असलेला वास्तुदोष देखील कारणीभूत असू शकतो, हिंदू धर्मामध्ये वास्तुशास्त्राला खूप महत्त्व आहे. वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घराची दिशा, योग्य असेल तुमच्या घराचं बांधकाम हे वास्तुशास्त्रानुसार असेल तरी देखील तुम्ही रोजच्या जीवनामध्ये अशा काही छोट्या-छोट्या चुका करतात ज्यामुळे तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होतो. वास्तुदोषामुळे तुमच्या आयुष्यात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. जर तुमच्याही हातात पैसा टिकत नसेल तर यामध्ये देखील वास्तुदोष असू शकतो, आज आपण वास्तूदोष दूर करण्याचे काही सोपे उपाय जाणून घेणार आहोत.
लक्ष्मी मातेला कमळाचं फूल अर्पण करा
लक्ष्मी मातेला धनाची देवी म्हटलं जातं. ज्या व्यक्तीवर किंवा कुटुंबावर लक्ष्मी मातेचा आशीर्वाद असतो, त्या घरामध्ये कधीही पैशांची कमतरता भासत नाही, त्यामुळे जर तुमच्या घरात वास्तुदोष असेल आणि तुम्हाला पैशांसंबंधी काही अडचणी जाणवत असतील तर घरामध्ये लक्ष्मी मातेचा फोटो किंवा मूर्ती ठेवा, दररोज सकाळी लक्ष्मी मातेची पूजा करून, फोटोला एक कमळाचं फूल अर्पण करा, घरातील सर्व वास्तूदोष दूर होतील.
उत्तरेला कुबेराचा फोटो लावा
उत्तर दिशा ही कुबेराची आवडती दिशा असते, त्यामुळे उत्तर दिशेला कुबेराचा फोटो लावावा, त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि पैशांच्या संबंधित सर्व अडचणी दूर होतात.
घराची तिजोरी
तुमची पैशाची जी तिजोरी आहे, त्यामध्ये नेहमी एक लक्ष्मी मातेचा फोटो असलेलं चांदीचं नाणं किंवा लक्ष्मी मातेची मूर्ती ठेवा. तुम्हाला कधीही पैशांची कमतरता भासणार नाही, तुमची तिजोरी सदैव पैशांनी भरलेली राहील. सोबतच घर नेहमी स्वच्छ ठेवा, घर स्वच्छ असल्यास घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा राहते, असं वास्तुशास्त्र सांगण्यात आलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)