AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Tips: वास्तूशास्त्रातले हे सोपे उपाय क्षणात दुर करतील गृहकलह, घरात नांदेल सुख-शांती

वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरातील खराब वास्तूमुळे, सुखी संसारात संकटं घेऊन येतात. तथापि, काही उपाय आहेत ज्याचा आपण अवलंब करू शकतो. 

Vastu Tips: वास्तूशास्त्रातले हे सोपे उपाय क्षणात दुर करतील गृहकलह, घरात नांदेल सुख-शांती
वास्तूशास्त्रImage Credit source: Social Media
| Updated on: Feb 08, 2023 | 5:29 PM
Share

मुंबई, तुम्ही तुमच्या आजूबाजूला किंवा तुमच्या घरात अनेकवेळा पाहिलं असेल की, अचानक एखाद्या छोट्या गोष्टीवरून वादाची परिस्थिती निर्माण होते आणि बघता बघता त्याचं मोठ्या वादात रूपांतर होतं. यामुळे कुटुंबातील सुख-शांती तर बिघडतेच, पण कुटुंबातील सदस्यांमध्ये दुरावाही निर्माण होतो. पण असं का होतं, अचानक घराचं वातावरण का बिघडतं हे समजत नाही. कधी कधी आपल्या चुका घरगुती कलह किंवा वादाचे कारण बनतात तर कधी त्यामागे वास्तुदोष (Vastu tips) असतो. होय, वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरातील खराब वास्तूमुळे, सुखी संसारात संकटं घेऊन येतात. तथापि, काही उपाय आहेत ज्याचा आपण अवलंब करू शकतो.

जाणून घेऊया काय करावे उपाय.

  1. वास्तुशास्त्रानुसार, जर तुमच्या घरात अचानक संकट वाढले असेल आणि तुम्हाला त्यातून सुटका हवी असेल तर सकाळी आणि संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजावर दिवा लावा. यासोबतच सकाळ संध्याकाळ घराच्या मंदिरात दिवा लावावा.
  2. याशिवाय तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा पसरवणे टाळा. यासाठी काही छोट्या गोष्टींची काळजी घ्या. उदाहरणार्थ, घरात बंद पडलेले घड्याळ काढा किंवा पुन्हा सुरू करा.
  3. याशिवाय जुने कॅलेंडरही घरात टांगू नये, तसेच ठेवू नये. कारण ते नकारात्मकताही पसरवतात.
  4. जर परस्पर संबंधांमध्ये दुरावा खूप वाढला असेल तर शनिवारी सुंदरकांड पाठ करावे. कारण मंगळाच्या कमकुवतपणामुळेही घरामध्ये विरक्तीची परिस्थिती निर्माण होते.

कुटुंबात होत असतील मतभेद तर हे करा

कधीकधी मतभेद काही लोकांच्या आयुष्यात अडचणीचे मोठे कारणबनते. तुमच्याही कुटुंबात कायम वाद होत असतील किंवा मतभेदांमुळे घरातील शांतता भंग होत असेल तर एकदा तुरटीशी संबंधित हा उपाय अवश्य करा. ज्योतिषशास्त्रानुसार घरातील कलह दूर करण्यासाठी घराच्या कोणत्याही कोपऱ्यात काचेच्या भांड्यात तुरटी  ठेवा आणि दर मंगळवारी बदलत राहा. या उपायाने घरात सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते. गृहकलह संपुष्टात येतात.

घरात नकारात्मक ऊर्जा जाणवत असल्यास उपाय

घरात नकारात्मक ऊर्जा जाणवत असल्यास  ती दूर करण्यासाठी तुम्ही दररोज तुरटी पाण्यात मिसळून घर पुसून काढावे. वाईट नजर टाळण्यासाठी किंवा नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी, तुरटीचा तुकडा काळ्या कपड्यात बांधून दारात लटकवा. तुरटीचा हा उपाय केल्याने चमत्कारिक बदल होतात असे मानले जाते.

वाईट स्वप्नांसाठी उपाय

जर तुम्हाला रात्री झोपताना भयानक स्वप्ने येत असतील किंवा तुमच्या घरातील मूल रात्री अचानक जागे होत रडत आले तर यावर देखील तुरटीचा एक उपाय सांगण्यात आलेला आहे. असे मानले जाते की  तुरटीचा तुकडा कापडात बांधून पलंगाखाली ठेवल्यास भीतीदायक स्वप्न पडणे थांबतात.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.