
ईशान्य दिशेला दररोज दिवा लावा . यामुळे आरोग्य चांगले राहते. जर घरातील नळातून सतत टपकल्याने नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. हे आरोग्यासाठी चांगले नाही. त्यामुळे असे नळ योग्य वेळी दुरुस्त करा.

अभ्यास करताना किंवा काम करताना उत्तर किंवा पूर्वेकडे तोंड करावे. यामुळे स्मरणशक्ती चांगली वाढवते. तुळशीची रोपे लावल्याने घरातील हवा शुद्ध होते. घरामध्ये निवडुंग आणि काटेरी झाडे लावणे टाळा. यामुळे तुमचा आजार आणि तणाव वाढू शकतो.

दक्षिण-पश्चिम दिशेला असलेला मास्टर बेडरूम शारीरिक आणि मानसिक स्थिरता आणते. बेडरूम कधीही ईशान्य दिशेला ठेवू नका. त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात.घरातील आरसा नेहमी घराच्या पूर्व किंवा उत्तर भिंतीवर लावावा. तसेच, तो अशा प्रकारे लावा की जो आरसा पाहिल त्याचा चेहरा पूर्व किंवा उत्तर दिशेने असावा.

घराच्या ईशान्य कोपर्यात पायऱ्या किंवा शौचालय बांधू नका. त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात आणि मुलांची बौधिक वाढ खुंटते. त्यामुळे घरी बंधताना या गोष्टीकडे लक्ष द्या

झोपताना नेहमी दक्षिण दिशेला डोके ठेवून झोपावे. हे शांत आणि निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देते. उत्तरेकडे डोके ठेवून झोपणे योग्य नाही कारण यामुळे तणाव वाढतो. उत्तर दक्षिण झोपू नये यामुळे आरोग्यासंबंधी तक्रारी वाढतात.