
वास्तुशास्त्र हे आपल्या जीवनातील प्रत्येक सकारात्मक गोष्टींसंदर्भात मार्गदर्शक करते. वास्तुशास्त्रानुसार घराच्या सजावटीपासून ते घरातील छोट्या-छोट्या वस्तुंपर्यंत सर्व घटक तुमच्या आयुष्यावर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम निर्माण करत असतात. घड्याळाचा देखील या वस्तूंमध्ये समावेश होतो. घड्याळ हे केवळ वेळ सांगण्याचंच साधन नाहीये तर ते तुमच्या घरात येणाऱ्या ऊर्जेला देखील प्रभावित करत असते, योग्य दिशेला आणि योग्य रंगाचे घड्याळ तुम्ही जर भिंतीवर लावले तर तुमच्या घरात आनंदाचं वातावरण राहतं, कुटुंबात सुख शांती येते. योग्य दिशेला लावलेलं घड्याळ हे तुमच्या घरात नेहमी सकारात्मक ऊर्जेची निर्मिती करतं असं वास्तुशास्त्रात म्हटलं आहे.
वास्तुशास्त्रानुसार घरात किंवा कार्यालयात घड्याळ लावण्यासाठी पूर्व दिशा सगळ्यात जास्त शुभ मानण्यात आली आहे. कारण पूर्व दिशा ही सुर्याची दिशा असते. त्यामुळे तुम्ही जर घड्याळ पूर्व दिशेला लावलं तर घरातील कुटुंबप्रमुखाला किंवा इतर सदस्यांना जसा दिवस रोज उगतो, त्याचप्रमाणे प्रगतीच्या नवनवी संधी प्राप्त होतात. व्यक्तीला त्याच्या कार्यक्षेत्रात यश मिळतं. या शिवाय पूर्व दिशा ही मुलांच्या अभ्याससाठी देखील शुभ मानली गेली आहे. या दिशेला जर तुम्ही घड्याळ लावले तर ते वातावरण संतुलीत करते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करते.
उत्तर दिशा ही कुबेराची दिशा मानली जाते, ही दिशा धन आणि भाग्याचं प्रतिक आहे. जर तुम्ही उत्तर दिशेला घड्याळ लावलं तर तुमच्या घरात आर्थिक स्थिरता निर्माण होते, आणि धनात देखील वृद्धी होते. जे लोक व्यवसाय करतात त्या लोकांसाठी उत्तर दिशा ही विशेष शुभ मानली जाते. उत्तर दिशेला जर घड्याळ लावले तर व्यक्तीला वेळेचं महत्त्व आणि नव्या संधी लक्षात येतात, असं वास्तुशास्त्र सांगतं. उत्तर दिशेला लावण्यात आलेल्या घड्याळामुळे कुटुंबात शांतता आणि प्रेम, आपुलकी रहाते, पत्नी -पत्नीमध्ये कधीच भांडणं होत नाहीत.
वास्तुशास्त्रानुसार घराच्या दक्षिण दिशेला घड्याळ लावू नये, ही दिशा अशुभ मानली जाते. दक्षिण दिशा ही यमराजांची दिशा असते. त्यामुळे या दिशेला घड्याळ लावलं तर घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तर पश्चिम दिशेला घड्याळ लावल्यास तुम्हाला नव्या संधी मिळ नाहीत, तुम्हाला ज्या संधी मिळणार असतात त्यामध्ये अडथळा निर्माण होतो, त्यामुळे तुमची प्रगंती थांबू शकते. त्यामुळे कधीही घड्याळ हे उत्तर किंवा पूर्व दिशेलाच लावावे ज्यामुळे तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन, प्रगतीच्या नव्या संधी निर्माण होतात.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)