Vastushastra : सोमवारी चूकुनही खरेदी करू नका या वस्तू; कायम आर्थिक अडचणी येत राहातील

हिंदू धर्मशास्त्रानुसार प्रत्येक वार हा कोणत्या न कोणत्या देवाला समर्पित आहे. सोमवार हा भगवान महादेवांना समर्पित आहे. तसेच सोमवार हा वार चंद्राशी देखील संबंधित आहे. त्यामुळे सोमवारी काही विशिष्ट गोष्टी खरेदी करू नये, यामुळे घरातील आर्थिक अडचणी वाढतात, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

Vastushastra : सोमवारी चूकुनही खरेदी करू नका या वस्तू; कायम आर्थिक अडचणी येत राहातील
Vastushastra
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 23, 2026 | 8:21 PM

हिंदू धर्मशास्त्रानुसार प्रत्येक वार हा कोणत्या न कोणत्या देवतेला समर्पित असतो. जसं की रविवार हा सूर्य देवतेला समर्पित असतो, सोमवार हा भगवान महादेवांना समर्पित असतो. मंगळवार हा देवीला समर्पित असतो, गुरुवार हा भगवान दत्त आणि भगवान विष्णू यांना समर्पित असतो. शनिवार हा शनी महाराजांना समर्पित असतो. सोमवार हा जसा भगवान महादेव यांना समर्पित असतो, तसाच या वाराचा संबंध हा चंद्राशी देखील येतो. त्यामुळे या दिवशी काही विशिष्ट गोष्टी खरेदी करू नये, असा सल्ला वास्तुशास्त्रात देण्यात आला आहे. सोमवारचा संबंध चंद्राशी येतो. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र ग्रह हा भावना, जल तत्व आणि मनाची शांतीचा कारक ग्रह आहे. त्यामुळे तुम्ही जर या दिवशी काही विशिष्ट गोष्टी खरेदी केल्या तर तुमच्या घरात असलेलं ऊर्जेचं संतुलन बिघडून वास्तुदोष निर्माण होऊ शकतो. त्यामुळे घरात येताच अस्वस्थ वाटणं, कायम आर्थिक अडचणी निर्माण होणं, तसेच मनाची चिडचिड अशा प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊयात सोमवारच्या दिवशी कोणत्या वस्तू खरेदी करू नये? त्याबद्दल.

सोनं, चांदी किंवा पांढऱ्या वस्तू खरेदी करू नका – सोमवार हा चंद्राचा दिवस आहे. चांदी, पांढरे कपडे दूध, दही, मोती किंवा कोणत्याही पांढऱ्या रंगाच्या वस्तूंचा संबंध हा चद्राशी असतो, त्यामुळे सोमवारच्या दिवशी अशा गोष्टी खरेदी करू नये, त्यामुळे तुमच्या घरातील सकारात्मक ऊर्जा कमी होऊन घरात नकारात्मक ऊर्जा वाढते, ज्यामुळे तुमच्या घरातील ऊर्जा संतुलन बिघडते ज्याचा परिणामा हा थेट तुमच्या दैनंदिन आयुष्यावर होतो. यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही अडचणी जाणवण्यास सुरुवात होते. जसं की घरात काही कारण नसताना कलह वाढतो, पती-पत्नीचं पटत नाही. मनाची सतत चिडचिड होते, याचा महत्त्वाचं कारण म्हणजे चंद्र हा मनाच्या शांततेचा कारक ग्रह आहे, त्यामुळे सोमवारच्या दिवशी अशा वस्तू खरेदी करणं टाळावं असा सल्ला वास्तुशास्त्रात देण्यात आला आहे.

Loading...

पांढरं फूलं, कपडे किंवा मोती खरेदी करू नका – सोमवार हा जसा भगवान महादेव यांना समर्पित वार आहे, तसा त्याचा संबंध चंद्राशी देखील आहे. पांढरा रंग हा चंद्राचा कारक रंग असतो, त्यामुळे या दिवशी कोणतीही पांढरी वस्तू असेल तर ती खरेदी करणं शक्यतो टाळलं पाहिजे. पांढरे फूल, कपडे मोती अशा वस्तू खरेदी करू नये, तसेच दूध आणि दह्यापासून बनवलेल्या वस्तू देखील खरेदी करू नये, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. ज्यांचा चंद्र ग्रह कमजोर आहे, त्यांनी पाण्याची नासाडी टाळावी, असा सल्ला देखील वास्तुशास्त्रात देण्यात आला आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us