Vastushastra : घरात या तीन मूर्ती कधीच ठेवू नका, अन्यथा कंगाल व्हाल, घरात सतत भांडण होतील
वास्तुशास्त्रानुसार अशा काही मूर्ती असतात ज्या घरात ठेवल्या नाही पाहिजेत. या मूर्तींमुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यात आर्थिक नुकसान होऊ शकतं, तसेच तुमचं घर नेहमी अशांत राहतं. काही कारण नसताना पती-पत्नीमध्ये सतत भांडणं होतात. चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्रात नेमकं काय सांगितलं आहे? त्याबद्दल.

वास्तुशास्त्रानुसार तुमच्या भोवती ज्या काही वस्तू असतात, त्याचा तुमच्यावर प्रभाव पडत असतो. हा प्रभाव सकारात्मक किंवा नकारात्मक असू शकतो. जेव्हा एखाद्या गोष्टीचा तुमच्या आयुष्यावर नकारात्मक प्रभाव पडतो तेव्हा तुमच्या आयुष्यात अनेक समस्या येऊ शकतात. जसं की पती-पत्नीचं पटत नाही, त्यामुळे घरात सारखी भांडणं होतात, अचानक एखादं मोठं आर्थिक संकट येतं, असे त्याचे साधारणपणे परिणाम असतात. परंतु जेव्हा तुमच्या आयुष्यावर एखाद्या गोष्टीचा सकारात्मक प्रभाव पडतो, तेव्हा मात्र तुमचं आयुष्यच बदलून जातं. तुम्हाला प्रगतीच्या संधी मिळतात, तुमच्या घरात सुख शांती राहते, घराला आर्थिक स्थैर्य प्राप्त होतं. वास्तुशास्त्रानुसार अशा काही मूर्ती असात ज्या घरात ठेवू नये असं मानलं जातं, त्यामागे विविध कारणं आहेत, आज आपण अशाच काही मूर्तींबद्दल माहिती जाणून घेणार आहेत.
शनी देवाची मूर्ती – देवघरामध्ये कधीही शनी देवाची मूर्ती ठेवू नये, किंवा घरात शनी देवाचा फोटो नसावा असं वास्तुशास्त्र सांगतं. त्यामागे असलेलं कारण म्हणजे शनी देवाची दृष्टी ही वक्र असते, ज्याच्यावर शनी देवाची वक्र दृष्टी पडते त्याच्या आयुष्यात अडचणी येण्यास सुरुवात होते. त्यामुळे शनी देवाचं दर्शन घेताना कधीही समोरून घेतलं जात नाही, तर बाजुने घेतलं जातं आणि आपण देवघरात जे देव ठेवतो त्यांचं दर्शन आपण समोरून घेतो, त्यामुळे देव घरात शनी देवाची मूर्ती नसावी असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.
उजव्या सोंडेचा गणपती – उजव्या सोंडेचा गणपती घरात असणं हे अत्यंत शुभ माण्यात आलं आहे, मात्र त्याचं सोवळ हे खूप कडक असतं, जर सर्व नियमांचं पालन व्यवस्थित झालं नाही तर घरात अडचणी निर्माण होण्यास सुरुवात होते, त्यामुळे घरात उजव्या सोंडेचा गणपती असू नये असं मानलं जातं.
नटराजची मूर्ती – घरामध्ये नटराजची मूर्ती ठेवू नये, यामुळे घरात काहीही कारण नसताना वादविवाद होतात असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)