Vastushastra: घरात अचानक मुंग्यांची रांग दिसण्याचा अर्थ काय? …तर तुम्ही मालामाल व्हाल
वास्तुशास्त्रानुसार आपल्या भोवती जेवढ्या काही वस्तू असतात, प्राणी असतात, पक्षी असतात त्या सर्वांचा आपल्यावर सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव पडत असतो. तुम्ही कधी निरीक्षण केलं आहे का? तुम्हाला कधी-कधी अचानक तुमच्या घरात मुंग्यांची रांग लागल्याचं दिसून येतं. आपल्या दृष्टीने ही तशी सामान्य घटना आहे. परंतु वास्तुशास्त्रानुसार हा एक मोठा संकेत असतो.

वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये तुमच्या घरात निर्माण झालेला वास्तुदोष दूर करण्याचे विविध उपाय सांगण्यात आले आहेत. वास्तुशास्त्रानुसार जर तुमच्या आयुष्यात काही बदल घडणार असेल तर त्याचे संकेत तुम्हाला त्या घटनेपूर्वीच मिळत असतात. मात्र ते तुम्हाला ओळखता आले पाहिजेत. तुम्ही अनेकदा पाहिलं असेल कधी-कधी तुमच्या घरात मुंग्यांची रांग लागते. या मुंग्या काळ्या किंवा लाल असतात. तुमच्या दृष्टीने ही एक सामान्य घटना आहे. परंतु वास्तुशास्त्रानुसार घरात मुंग्या जर आल्या तर ते विशिष्ट गोष्टींचे संकेत असतात. अर्थात तुमच्या घरात कोणत्या मुंग्या आल्या आहेत, काळ्या की लाल? त्या मुंग्या कोणत्या दिशेनं निघाल्या आहेत? घरातील कोणत्या भागात मुंग्यांची रांग लागली आहे, यावर तुमच्या आयुष्यात भविष्यात काय बदल घडणार आहेत? हे अवलंबून असतं. चला तर आज मुंग्यांबद्दल वास्तुशास्त्रात नेमकं काय सांगण्यात आलं आहे? त्याबद्दल जाणून घेऊयात,
काळ्या मुंग्यांची शुभ दिशा – मुंग्यांना शिस्त आणि चिकाटीचं प्रतिक मानलं जातं. त्यामुळे घरात मुंग्या निघणं हे शुभ समजण्यात येतं. तुमच्या घरात जर काळ्या मुंग्या या पश्चिम दिशेनं निघाल्या असतील तर हा एक अत्यंत शुभ संकेत मानला जातो. याचा अर्थ लवकरच तुमच्या आयुष्यात अकस्मात धनाचा योग येणार आहे, किंवा तुम्ही कुठेतरी लांब विदेशवारी करणार आहात. तुमचं नोकरीमध्ये प्रमोशन होणार आहे, असा होतो. काळ्या मुंग्यांना सुख आणि समृद्धीचं प्रतिक मानलं जातं.
धान्याच्या आसपास मुंग्या दिसणं – जर तुम्हाला तांदूळ, बाजरी, गहू अशा धान्याच्या आसपास मुंग्या दिसल्या तर तो एक अत्यंत शुभ संकेत असतो. तुमच्या घराला लवकरच आर्थिक स्थैर्य प्राप्त होणार आहे, असा त्याचा अर्थ होतो. असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.
तोंडात अंडे असलेल्या लाला मुंग्या – जर तोंडात अंडे असलेल्या लाल मुंग्यांची रांग तुमच्या घरात लागली असेल तर वास्तुशास्त्रानुसार हा एक तुमच्या घरासाठी अत्यंत शुभ संकेत मानला जातो. यामुळे तुमच्या घरातील सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर होऊन, घराला आर्थिक समृद्धी लाभते, असं वास्तुशास्त्र सांगतं.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)