Venus Transit: शुक्र ग्रहाचे संक्रमण, पुढच्या 40 दिवसांत ‘या’ 3 राशींचं फळफळणार नशीब

Venus Transit: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांना फार महत्त्व आहे. ग्रह जेव्हा त्यांचं स्थान बदलतात तेव्हा 12 राशींवर चांगले वाईट परिणाम होत असतात. तर लवकरत शुक्र ग्रहाचं संक्रमण होणार असल्याचं सांगितलं जात आहे, ज्यामुळे या 3 राशींचं नशीब फळबळणार आहे.

Venus Transit: शुक्र ग्रहाचे संक्रमण, पुढच्या 40 दिवसांत या 3 राशींचं फळफळणार नशीब
| Updated on: Nov 14, 2026 | 10:16 AM

Venus Transit: ग्रह जेव्हा त्यांचं स्थान बदलतात, तेव्हा त्यांचे चांगले वाईट परिणाम 12 राशींवर होत असतात. र लवकरत शुक्र ग्रहाचं संक्रमण होणार असल्याचं सांगितलं जात आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्राला राक्षसांचा गुरू मानलं जातं. शुक्र हा सौंदर्य, ऐश्वर्य, प्रेम, संपत्ती आणि समृद्धीचा घटक आहे. जेव्हा जेव्हा या शुक्राच्या स्थानात बदल होतो, तेव्हा त्याचा प्रभाव सर्व राशींमध्ये दिसून येतो. सध्या, शुक्र कन्या राशीत आहे. या स्थितीत, 22 नोव्हेंबर रोजी शुक्र तूळ राशीत प्रवेश करून भ्रमण करेल. तूळ ही शुक्राची स्व-राशी असल्यामुळे, हे संक्रमण खूप विशेष मानले जाते.

शुक्र ग्रह 22 नोव्हेंबर रोजी तूळ राशीत प्रवेश करेल आणि 1 जानेवारी 2027 पर्यंत याच राशीत राहील. या शुक्र संक्रमणाचा प्रभाव सर्व राशींना जाणवेल, परंतु शुक्र संक्रमणामुळे तीन राशींना चांगला आर्थिक लाभ मिळेल. त्यामुळे जाणून घ्या कोणत्या आहेत त्या तीन राशी, ज्यांच नशीब फळफळणार आहे.

Loading...

सिंह: होणाऱ्या बदलांमुळे सिंह राशींना अनेक प्रकारे फायदा होईल. आत्मविश्वास वाढेल. त्यांना कठीण कामे पूर्ण करण्याचे चांगले मार्ग सापडतील. नोकरी शोधणाऱ्यांना चांगली नोकरी मिळेल. तुम्हाला कार्यालयात तुमची कौशल्ये दाखवण्याची संधी मिळेल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामगिरीवर समाधानी होतील. समाजात तुमचा दर्जा आणि प्रतिष्ठा वाढेल. तुम्हाला प्रगतीसाठी नवीन संधी मिळतील. तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल.

वृश्चिक: या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारेल. उत्पन्न वाढवण्यासाठी नवीन मार्ग खुले होतील. तुम्ही एक आनंदी जीवन जगाल आणि तुमच्या गरजेनुसार खर्च करण्याची संधी मिळेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा सुवर्णकाळ असेल. जे आपले इच्छित काम करत आहेत त्यांना चांगली बातमी मिळेल आणि प्रेम जीवनातील समस्या कमी होतील. विवाहित महिलांना सुखी जीवन मिळेल आणि तुमच्या जोडीदारासोबतचे तुमचे नाते सुधारेल. या काळात तुम्हाला सुंदर आठवणी निर्माण करण्याची संधी मिळेल.

कर्क: या राशीच्या लोकांना नवीन संधी मिळतील. तुम्हाला नवीन घर किंवा वाहन खरेदी करण्याची संधी मिळेल. तुमचे तुमच्या पालकांसोबतचे संबंध सुधारतील. जे नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगली नोकरी मिळेल. तुमच्या मेहनतीचे कौतुक होईल. परिणामी, तुमची स्थिती मजबूत होऊ शकते. व्यावसायिकांना अनपेक्षित आर्थिक लाभ मिळेल. एकूणच, कौटुंबिक जीवन आणि करिअर चांगले राहील.

(डिस्क्लेमर: सदर लेखातील माहिती केवळ ज्योतिषशास्त्रीय गृहीतके आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. आम्ही यातील तथ्यांची किंवा दाव्यांची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणं हा आमचा हेतू नाही.)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us