AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vidur Niti: जीवनात व्हायचे असेल यशस्वी तर विदुर नीतीच्या या दहा नियमांचे करा पालन

महाभारतात धृतराष्ट्राचे सावत्र भाऊ विदुर यांची नीती जगप्रसिद्ध आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी विदुर यांनी काही उपाय सांगितले आहे.

Vidur Niti: जीवनात व्हायचे असेल यशस्वी तर विदुर नीतीच्या या दहा नियमांचे करा पालन
विदुर Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Nov 13, 2022 | 2:43 PM
Share

मुंबई, महात्मा विदुर (Vidur) हे दासीचे पुत्र होते. नात्यात ते धृतराष्ट्राचे सावत्र भाऊ होते. महाभारताच्या काळात त्यांनी लोकांना आपल्या नीतीची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला. विदुर हे कुशल राजकारणी असल्याचे सांगितले जाते. त्यांनी सांगितलेली नीती  अंगीकारून जीवनात यश मिळवता येते. जीवन सुसह्य आणि यशस्वी होण्यासाठी त्यांनी अतिशय सोप्या पद्धती सांगितल्या आहेत. ज्यामुळे जीवन जगणे आणि पुढे जाणे सोपे होते. विदुरचे यांची नीती (Vidur Niti) काय आहे जाणून घेऊया.

  1.  जे विश्वास ठेवण्यास पात्र नाहीत त्यांच्यावर कधीही विश्वास ठेवू नका, परंतु जे विश्वास ठेवण्यास पात्र आहेत त्यांच्यावर कधीही अविश्वास दाखवू नका.
  2.  वासना, क्रोध, लोभ, हे तिन्ही नरकाचे दरवाजे आहेत. हे तिघे आत्म्याचा नाश करणारे आहेत. त्यामुळे त्यांच्यापासून नेहमी दूर राहा.
  3.  जो चांगले कर्म करतो आणि वाईट कर्मांपासून दूर राहतो. त्याच्या आयुष्यात अडचणी कमी येतात.
  4. ज्याचा आदर केला जातो तेव्हा तो आनंदाने बहरून जात नाही. अनादर झाल्यावर राग येत नाही. अशा माणसाला ज्ञानी म्हणतात.
  5. कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी तुम्ही पूर्ण विचार करणे महत्त्वाचे आहे. अर्धवट विचार केलेले काम अपूर्ण असते.
  6. कोणत्याही कामात पूर्ण यश तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही ते काम मनापासून कराल.
  7. ज्याला मनावर ताबा ठेवता येत नाही तो कधीही यश मिळवू शकत नाही.
  8. ज्याच्या हेतूबद्दल तुम्हाला शंका आहे अशा कोणत्याही व्यक्तीला तुम्ही तुमचे पैसे कधीच देऊ नका. अशी व्यक्ती तुमच्या पैशांचा गैरवापर करते आणि तुम्हाला अडचणीतही आणू शकते.
  9. जो माणूस बलवान असतानाही क्षमा करू शकतो आणि गरीब असतानाही दान करू शकतो, त्याला स्वर्गात स्थान मिळते.
  10. तुमचे पैसे कधीही आळशी व्यक्तीच्या हाती देऊ नका. त्याच्या आळशीपणामुळे तो संपत्तीचा नाश करतो.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला