
हिंदू धर्मामध्ये विनायक चतुर्थीला अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा केली जाते. प्रत्येक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. विनायक चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा केल्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व अडथळे कमी होण्यास मदत होते. तुमच्या महत्त्वाच्या कामामध्ये अडथळे येत असतील तर तुम्ही तुम्ही विनायक चतुर्थीची पूजा करणे फायदेशीर ठरते. गणपतीला विघ्नहर्ता म्हणून ओळखले. तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर करण्यास मदत होते. विनायक चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा केल्यामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होण्यास मदत होते.
विनायक चतुर्थीच्या दिवशी व्रत केल्यामुळे तुम्हाला बुद्धी, ज्ञान आणि समृद्धीची प्राप्ती होते. विनायक चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा केल्याने भक्तांच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होण्यास मदत होते. पंचांगानुसार, फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी शनिवार, 2 मार्च रोजी रात्री 9:01 वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी, रविवार, 3 मार्च रोजी संध्याकाळी 6:02 वाजता संपेल. अशा परिस्थितीत, उदयतिथीनुसार, विनायक चतुर्थीचे व्रत 3 मार्च रोजीच पाळले जाईल. या दिवशी रात्री 10:11 वाजता चंद्र मावळेल.
विनायक चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहू नये. या दिवशी कोणाचाही अपमान करू नये. या दिवशी नकारात्मक विचारांपासून दूर राहा. आणि सकारात्मक विचार ठेवा. मांस, मद्य इत्यादी तामसिक अन्न सेवन करू नका आणि रागावू नका आणि शांत रहा. या दिवशी कोणत्याही प्राण्याला त्रास देऊ नये. माणसाने नेहमी दुसऱ्यांना मदत केली पाहिजे.
विनायक चतुर्थीच्या दिवशी विधीनुसार पूजा केल्याने लोक त्यांच्या सर्व समस्या आणि अडथळ्यांपासून मुक्त होतात. तसेच, बुद्धिमत्ता आणि ज्ञान वाढते. याशिवाय कुटुंबात सुख आणि समृद्धी प्राप्त होते. विनायक चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा केल्याने भक्तांच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि त्यांना सुख-शांती मिळते. याशिवाय जीवनात येणाऱ्या त्रासांपासून आराम मिळतो.