Vinayaka Chaturthi 2025: विनायक चतुर्थीला उपवास कधी सोडायचा? जाणून घ्या

विनायक चतुर्थी हा हिंदू धर्मातील श्री गणेशाला समर्पित एक महत्त्वाचा सण आहे. या दिवशी गणपतीची विधिवत पूजा केली जाते. विनायक चतुर्थीचा शुभ मुहूर्त कोणता आहे आणि उपवास कसे करायचे जाऊन घ्या.

Vinayaka Chaturthi 2025: विनायक चतुर्थीला उपवास कधी सोडायचा? जाणून घ्या
Vinayaka Chaturthi 2025
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Feb 01, 2025 | 3:02 PM

हिंदू धर्मात विनायक चतुर्थीला अन्यन्य साधारण महत्व आहे. जो गणेशाला समर्पित आहे. हा सण दर महिन्याच्या चतुर्थी तिथीला साजरा केला जातो. या दिवशी गणेशाची पूजा करण्याची परंपरा आहे. गणपतीला विघ्नहर्ता म्हणून ओळखले जाते आणि त्यांची पूजा केल्याने सर्व प्रकारचे अडथळे दूर होतात तसेच घरात सुख-समृद्धी येते. असे म्हटले जाते. त्यातच आपण जेव्हा कोणतेही शुभकार्य सुरू करतो त्यापूर्वी गणेशाची पूजा केली जाते.

पंचांगानुसार माघ महिन्यातील शुक्ल पक्षाची चौथी तिथी 1 फेब्रुवारी शनिवार रोजी सकाळी 11 वाजून 38 मिनिटांनी सुरू झाली आणि दुसऱ्या दिवशी, 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजून 14 मिनिटांनी संपेल. अशा परिस्थितीत उदय तिथीनुसार विनायक चतुर्थीचा आज उपवास करावा आणि 2 फेब्रुवारी रविवारीला उपवास सोडावा.

संपूर्ण फळ प्राप्तीसाठी करा पूजा

आपल्या हिंदू धर्मात गणेशाची पूजा केल्यानंतरच इतर पूजेतून पूर्ण फळ मिळते. विनायक चतुर्थीचे व्रत केल्याने तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात आणि प्रत्येक क्षेत्रात यश मिळते. यासाठी तुम्ही विनायक चतुर्थीला गणपतीच्या 12 नावांचा जप, मंत्र आणि स्तोत्रांचे पठण करा. कारण ही पूजा विशेष फलदायी ठरते. तसेच या दिवशी पूजेदरम्यान गणपतीच्या 108 नावांचा जप करणे लाभदायक ठरते.

विनायक चतुर्थीला काय करावे?

विनायक चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि गणपतीची पूजा करण्याचा संकल्प करावा.

या दिवशी उपवास करून गणेशाची विधीवत पूजा करा.

गणेशाच्या मूर्तीला गंगेच्या पाण्याने स्नान करून चंदन हळद कुंकू व शेंदूर लावून पूजा करा.

विनायक चतुर्थीला गणपतीला हळद अर्पण करा.

“ॐ गं गणपतये नम:”, अशा गणेशाच्या विविध मंत्रांचा जप करा.

तसेच तुमच्या श्रद्धेने गणेशाला 11, 21, 51 किंवा 108 दूर्वा अर्पण करा.

गणेशाला मोदक आवडतात, त्यामुळे प्रसाद म्हणून मोदक अवश्य अर्पण करा.

शेवटी गणेशाची आरती करून लोकांना प्रसादाचे वाटप करावे.

पूजेनंतर गरीब व गरजूंना दान करावे.

विनायक चतुर्थीला काय करू नये?

विनायक चतुर्थीला कोणाचीही बदनामी किंवा कोणताही प्रकारचा कलह टाळा.

कोणावरही रागावू नका आणि खोटं बोलू नका.

मांसाहारी पदार्थ टाळा आणि कांदा आणि लसूण खाणे टाळा.

मनात नकारात्मक विचार आणणे टाळा.

विनायक चतुर्थीला काळे कपडे घालू नका.

या दिवशी चंद्राकडे पाहणे अशुभ मानले जाते तर चंद्राकडे पाहणे टाळावे.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)