AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरात गंगाजल ठेवल्याने काय होते? जाणून नक्कीच आश्चर्य वाटेल, तुमच्या घरी आहे का गंगाजल?

सनातन धर्मात गंगाजलला खूप महत्त्व आहे. तसेच ते घरात ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि पूजा पूर्ण होते. मात्र, गंगाजल ठेवण्याचे काही नियम आहेत ते मात्र माहित असणे गरजेचे असते. या नियमांचे पालन केल्याने अशुभ परिणाम टाळता येतात आणि शुभ फल प्राप्त होते. ते कोणते नियम आहेत जाणून घेऊयात.

घरात गंगाजल ठेवल्याने काय होते? जाणून नक्कीच आश्चर्य वाटेल, तुमच्या घरी आहे का गंगाजल?
what happens when you keep ganga water at home, you will definitely be surprised to knowImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 30, 2025 | 12:40 AM
Share

सनातन धर्मात, गंगा मातेला देवतांमध्ये सर्वोच्च मानले जाते, म्हणून घरात गंगाजल ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. असे मानले जाते की गंगेचे पवित्र पाणी मोक्ष देते आणि पूजा, शुद्धीकरण, अभिषेक आणि सर्व धार्मिक विधींमध्ये त्याचे विशेष महत्त्व आहे. गंगेच्या पाण्याशिवाय कोणतीही पूजा पूर्ण मानली जात नाही. अनेकदा लोक त्यांच्या घरी गंगाजल ठेवतात, परंतु बऱ्याचजणांना त्याबद्दलचे नियम माहित नसतातय त्यामुळे नकळतपणे त्या नियमांचे पालन करू न शकणे अशुभ ठरू शकते. यामुळे त्याचे शुभ परिणाम कमी होतातच परंतु नकारात्मक परिणाम देखील होऊ शकतात. जर घरी गंगाजल ठेवत असाल तर कोणती खबरदारी घ्यावी आणि गंगाजल घरात ठेवल्यास का फायदा होतो जाणून घेऊयात.

गंगाजल अंधारात किंवा घाणेरड्या जागी साठवणे टाळा

गंगेचे पाणी अत्यंत पवित्र मानले जाते, म्हणून ते कधीही अंधारात किंवा घाणेरड्या कोपऱ्यात साठवू नका. त्याचा दिव्य प्रभाव टिकवून ठेवण्यासाठी प्रकाश आणि स्वच्छता दोन्ही आवश्यक आहेत. स्वच्छ साफ जागेतच ठेवा. गंगाजल शक्यतो देवघरात ठेवण्याचा प्रयत्न करा.

तामसिक पदार्थ खाल्ल्यानंतर गंगाजला स्पर्श करणे टाळा

ज्या दिवशी तुम्ही मांस, मद्य किंवा कोणताही तामसिक पदार्थ खाता त्या दिवशी गंगाजला स्पर्श करणे टाळा. ज्या खोलीत हे पदार्थ सेवन केले जातात त्या खोलीत गंगाजल ठेवू देखील नका. त्यामुळे गृहदोष निर्माण होतो.

घरातील मंदिराचा ईशान्य कोपरा

गंगाजल ठेवण्यासाठी सर्वात योग्य स्थान मानला जाते ते म्हणजे घरातील मंदिराचा ईशान्य कोपरा. असे केल्याने नकारात्मकता दूर राहते आणि घरात सकारात्मक उर्जेची उपस्थिती वाढते. दररोज गंगाजलाच्या पात्राची भक्तीभावाने पूजा करणे देखील शुभ मानले जाते.

गंगाजल प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये साठवू नका

आजकाल, गंगाजल बहुतेकदा प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये मिळते आणि घरी देखील आपण तसेच प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये साठवतो. शास्त्रांमध्ये प्लास्टिकला अशुद्ध मानले गेले आहे. म्हणून, गंगाजल नेहमी तांबे, पितळ, माती किंवा चांदीच्या किंवा काचेच्या बॉटलमध्ये किंवा भांड्यात साठवावे. हे धातू शुद्ध आणि धार्मिकदृष्ट्या श्रेष्ठ मानले जातात.

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.