AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dussehra 2025: 1 की 2 ऑक्टोबर कधी आहे दसरा? जाणून घ्या महत्त्व आणि शुभ मुहूर्त

Dussehra 2025 date: दसरा हा सण मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. हिंदी धर्मात दसऱ्याचं मोठं महत्त्व देखील आहे. 2025 मध्ये दसरा कधी साजरा केला जाईल? 1 की 2 ऑक्टोबर. या सणाची नेमकी तारीख आणि महत्त्व जाणून घ्या...

Dussehra 2025: 1 की 2 ऑक्टोबर कधी आहे दसरा? जाणून घ्या महत्त्व  आणि शुभ मुहूर्त
फाईल फोटो
| Updated on: Sep 25, 2025 | 1:54 PM
Share

Dussehra 2025 date: हिंदू धर्मात दसरा या सणाचं फार महत्त्व आहे. भारतात दसरा हा सण मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. हा सण असत्याचा पराजय आणि धर्माचा विजय याचं प्रतीक आहे. दरवर्षी आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी विजयादशमी साजरी केली जाते. या दिवशी भगवान रामाने रावणाचा वध केला आणि सीतेला परत आणलं. म्हणून, हा सण रावण दहन म्हणून देखील साजरा केला जातो. सांगायचं झालं तर, दसऱ्याला विजयादशमी असंही म्हणतात. 2025 मध्ये दसऱ्याच्या तारखेबाबत लोकांमध्ये गोंधळ आहे. दसऱ्याची नेमकी तारीख आणि तो कधी साजरा केला जाईल याबद्दल जाणून घेऊया.

दसऱ्याची योग्य तिथी…

पंचांगानुसार, 2025 च्या दसऱ्यातील आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील दशमी तिथी खालीलप्रमाणे आहे:

दशमी तिथीची सुरुवात: 01 ऑक्टोबर 2025, बुधवार, दुपारी 12:12 वाजता

दशमी तिथी समाप्त: 02 ऑक्टोबर 2025, गुरुवार, दुपारी 01:13 वाजता

यंदाच्या वर्षी दसरा गुरुवार 02 ऑक्टोबर 2025 रोजी साजरा करण्यात येणार आहे.

विजय मुहूर्त (Shubh Muhurat for Dussehra Puja)

विजय मुहूर्त प्रारंभ: दुपारी 01:57 वाजता

विजय मुहूर्त समाप्त: दुपारी 02:44 वाजता

अवधी: 47 मिनिटं

दसऱ्याच्या दिवशी मुहूर्तावर पूजा करणं आणि शस्त्रांची पूजा करणं विशेषतः फलदायी मानलं जातं.

दसऱ्याचं महत्त्व…

सत्याचा असत्यावर विजय: या दिवशी भगवान रामाने रावणाचा वध करून धर्माचं रक्षण केलं.

आई दुर्गेचा विजय दिवस: नवरात्रीनंतर या दिवशी, आई दुर्गेने महिषासुराचा वध केला होता.

जीवनात विजय आणि यश टिकून राहावे म्हणून विजयादशमीच्या दिवशी शस्त्रे आणि हत्यारांची पूजा करण्याची परंपरा आहे. एवढंच नाही, दसऱ्याच्या दिवशी तुम्ही शुभ कार्याची देखील सुरुवात करु शकता. ज्यामुळे तुम्हाला यश मिळेल…

रावण दहन…

दसऱ्याच्या दिवशी, रावण, मेघनाथ आणि कुंभकर्ण यांचे पुतळे तयार केले जातात आणि विविध ठिकाणी जाळले जातात. हे वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानलं जातं. रावण दहन पाहण्यासाठी लोक उत्साहाने जत्रांमध्ये जातात. दसर्‍याला आपट्याची पाने वाटण्याची प्रथा आहे, ज्यात पानांना ‘सोनं’ समजून एकमेकांना दिले जाते

मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.