AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lohri 2022 | लोहरी सण कधी आहे? जाणून घ्या त्याचे महत्त्व आणि आख्यायिका

Lohri 2022 लोहरी (Lohari 2022) हा सण दरवर्षी देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. मकरसंक्रांतीच्या (Lohari) पूर्वसंध्येला, सर्वजण मिळून सण साजरा करतात. इतर सणांप्रमाणे हा सण देखील आनंदात सजरा केला जातो.

Lohri 2022 | लोहरी सण कधी आहे? जाणून घ्या त्याचे महत्त्व आणि आख्यायिका
lohari
| Edited By: | Updated on: Jan 12, 2022 | 9:12 AM
Share

मुंबई : लोहरी (Lohri 2022) हा सण दरवर्षी देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. मकरसंक्रांतीच्या (Lohri) पूर्वसंध्येला, सर्वजण मिळून सण साजरा करतात. इतर सणांप्रमाणे हा सण देखील आनंदात सजरा केला जातो. लोहरीच्या सणात (Festival) आग पेटवण्याचे विशेष महत्त्व असून त्यात प्रत्येकजण तीळ, गूळ, गजक, रेवडी, शेंगदाणे अर्पण करतो. लोहरी हा अनेक महत्त्वाचा सण आख्यायिका आणि सण पंजाब (Punjab Festival) विशेष म्हणून साजरा केला जातो. 2022 मधील लोहरी उत्सव 13 जानेवारी रोजी होणार आहे.

लोहरी हिवाळ्याचा शेवट हिंदू मान्यतेनुसार, लोहरी हा सण हिवाळा संपण्याचे प्रतीक मानला जातो. लोहरीचा हा सण मकर संक्रांतीच्या एक रात्र आधी मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो, याला माघी असेही म्हणतात.

जाणून घ्या काय आहे लोहरीची आख्यायीका लोहरीच्या सणाच्या दिवशी दुल्ला भाटीची गोष्ट खास ऐकली जाते. मुघल सम्राट अकबराच्या काळात दुल्ला भट्टी पंजाबमध्ये राहत होता. हिंदू मुलींना मध्यपूर्वेतील गुलामांच्या बाजारात बळजबरीने विकल्या जाण्यापासून लढ्याबद्दल पंजाबमध्ये त्याची आजही चर्चा होतो . कथेत असे म्हटले आहे की त्याने वाचवलेल्यांमध्ये सुंदरी आणि मुंद्री या दोन मुली होत्या, ज्या नंतर हळूहळू पंजाबच्या लोककथेचा विषय बनल्या.

लोहरी गाण्याला विशेष महत्त्व आहे लोहरी हा सण गाण्याशिवाय अपूर्ण मानला जातो. लहान मुले असो वा वडीलधारी मंडळी लोहरी सणावर आगपाखड करून घरोघरी फेरफटका मारून पारंपारिक लोकगीते गातात. या सणाच्या दुसऱ्या दिवशी मकर संक्रांती हा सण साजरा केला जातो. मकर संक्रांतच्या दिवशी बरेच महत्वाचे ग्रह एकत्रित येतात. या दिवशी सूर्य, शनि, गुरु, बुध आणि चंद्र मकर राशीत राहतील. जे शुभ योग निर्माण करतात. म्हणूनच या दिवशी केलेले दान तुमच्या जीवनात पुण्य, आनंद आणि समृद्धी आणते.

टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे.

Chanakya Niti : ही 5 लक्षणं म्हणजे, आर्थिक संकटाची घंटा! आताच तपासून पाहा

तुमच्या घरात ही पेंटिंग आहेत तर आताच काढा नाहीतर…

Drawing Room Vastu | ड्रॉईंग रूममधील वस्तू योग्य दिशेला ठेवा , नाहीतर आर्थिकनुकसान नक्की

साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.