मेहनतीसोबतच हवी आहे नशिबाची साथ? मग ऑफिसमध्ये या दिशेला तोंड करून बसणे सर्वात शुभ; करिअरमध्ये होईल प्रगती…
वास्तुशास्त्रात घराप्रमाणेच ऑफिससाठी देखील काही गोष्टी सांगितल्या आहेत. त्या जर पाळल्या तर तुमच्या कामात सुधारणा होण्यास नक्कीच मदत होईल. जसं की, ऑफिसमध्ये बसण्यासाठी कोणत्या दिशेला बसणे सर्वात शुभ मानले जाते? ज्यामुळे करिअरमध्ये प्रगती होण्यास मदत होते. चला जाणून घेऊयात.

वास्तुशास्त्रात अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. घरापासून ते घरातील मंदिरापर्यंत अनेक नियम सांगितले आहेत. तसेच घरातील दिशांबद्दलही अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. आणि त्या गोष्टी किंवा ते नियम पाळल्याने वास्तूदोषासारख्या अनेक अडचणी दूर होण्यास मदत होते. पण हे फार कमी जणांना माहित असेल की वास्तुशास्त्राानुसार फक्त घरातच नाही तर ऑफिसच्याबाबतही काही नियम सांगितले आहेत. ज्यामुळे आपली कामात प्रगती होण्यास मदत होते. जसं ऑफिसमध्ये कोणत्या दिशेने बसणे फायदेशीर असतं?
ऑफिसमधील बसण्याची योग्य दिशा?
वास्तुनुसार ऑफिसमधील बसण्याची दिशा जर योग्य असेल तर तुम्हाला तुमच्या नोकरीत पदोन्नती नक्की मिळते. तुमची मेहनतही तेवढीच महत्त्वाची भूमिका बजावते असते पण सोबतच वास्तूशास्त्राची जोड मिळाली तर नक्कीच तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करू शकत शकाल. तुमची प्रगती होण्यास मदतच होईल.
ऑफिसमध्ये चुकीच्या दिशेने बसल्याने मोठे नुकसान होते
जसं की, तुमचे सतत कोणत्या ना कोणत्या कर्मचाऱ्याशी वाद होत असतील, तुमचा बॉस तुमच्यावर अनेकदा रागावत असेल किंवा एखादा करार अंतिम होत नसेल, तर तुम्ही ऑफिसमध्ये चुकीच्या दिशेने बसला असण्याची शक्यता आहे. वास्तुनुसार, ऑफिसमध्ये चुकीच्या दिशेने बसल्याने मोठे नुकसान होते, म्हणून बसण्याची योग्य दिशा जाणून घेणे महत्वाचे आहे. ऑफिसमध्ये बसण्याची दिशा कोणती असावी हे जाणून घेऊयात.
या दिशेला तोंड करून बसणे शुभ
ऑफिसमध्ये पूर्वेकडे किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसणे शुभ मानले जाते. याशिवाय ईशान्य दिशेला काम करणे देखील शुभ असते. असे म्हटले जाते की या दिशेला ऑफिस टेबल असल्याने करिअरमध्ये जलद प्रगती होते. त्याचबरोबर पगारही वाढतो. ऑफिसमध्ये बॉसने पश्चिमेकडे बांधलेल्या केबिनमध्ये बसावे आणि त्यांचे तोंड ईशान्य दिशेला असावे. असे केल्याने कंपनी किंवा व्यवसायाची वेगाने वाढ होते.
ऑफिसमध्ये कोणत्या दिशेला बसून काम करू नये?
ऑफिसमध्ये काम करताना, चुकूनही आग्नेय दिशेला किंवा दक्षिण दिशेला तोंड करून बसू नये. असे म्हटले जाते की यामुळे एकाग्रता बिघडते आणि कामात यश मिळण्यास विलंब होतो.
ऑफिसच्या डेस्कवर कोणते रोप ठेवणे शुभ अन् लाभदायी?
ऑफिस डेस्कवर बांबू किंवा जेड प्लांटचे रोप ठेवणे शुभ मानले जाते. याशिवाय तुम्ही एरिका पाम, मनी प्लांट, ड्रॅकेना प्लांट देखील ठेवू शकता. असे म्हटले जाते की ही रोपे तुम्ही काम करत असलेल्या डेस्कवर ठेवल्याने तुमचं कामात मन लागतं तसेच त्यामुळे तुमच्यात ऊर्जाही कायम राहते.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
