ShaniDev | शनिदेवांशी नजर का मिळवू नये, कोणाच्या शापाने त्यांची दृष्टी वक्र झाली, जाणून घ्या ही पौराणिक कथा

शनिदेव हे छाया आणि भगवान सूर्य यांचे पुत्र मानले जातात. त्यांची पूजा देखील केली जाते परंतु शनिदेव यांच्या मूर्तीची पूजा नेहमी मंदिरातच केली जाते हे तुमच्या लक्षात आले आहे का? कोणीही शनिदेवाची मूर्ती घरात ठेवत नाही, किंवा पूजा करताना लोक त्याच्यांशी नजर मिळवत नाहीत. असे का घडते जाणून घेऊ

ShaniDev | शनिदेवांशी नजर का मिळवू नये, कोणाच्या शापाने त्यांची दृष्टी वक्र झाली, जाणून घ्या ही पौराणिक कथा
Lord-ShaniDev

मुंबई : शनिदेव हे छाया आणि भगवान सूर्य यांचे पुत्र मानले जातात. त्यांची पूजा देखील केली जाते परंतु शनिदेव यांच्या मूर्तीची पूजा नेहमी मंदिरातच केली जाते हे तुमच्या लक्षात आले आहे का? कोणीही शनिदेवाची मूर्ती घरात ठेवत नाही, किंवा पूजा करताना लोक त्याच्यांशी नजर मिळवत नाहीत. असे का घडते जाणून घेऊ (Who Cursed Shanidev And Why People Should Not Contact With Eyes Of Shanidev Know This Unknown Katha) –

धार्मिक मान्यतेनुसार कोणीही शनिदेवांशी नजर मिळवू नये. कारण शनिदेवांना हा शाप आहे की ज्यांच्यावरही ते आपली दृष्टी पाडतील त्याचं अशुभ होईल. त्याच्या दृष्टीपासून दूर राहण्यासाठी त्यांची मूर्ती घरात ठेवली जात नाही. हेच कारण आहे की लोक शनिदेवाची पूजा करताना त्यांच्याशी नजर मिळवत नाहीत किंवा त्यांच्यासमोर उभे राहून पूजा करत नाहीत.

शनिदेवांना पत्नीचा शाप मिळाला

पौराणिक कथेनुसार शनिदेव यांना आपल्या पत्नीने शाप दिला होता. एकदा शनिदेव भक्तीत लीन होते. तेव्हा त्यांची पत्नी शनिदेवांकडे संतान प्राप्तीची इच्छा घेऊन आली. पण शनिदेव ध्यानात इतके मग्न होते की त्यांनी पत्नीकडे पाहिलेही नाही. यामुळे त्यांच्या पत्नीला खूप राग आला आणि त्यांनी शनिदेवला शाप दिला की जर आपण आपल्या पत्नीला पाहू शकत नाही तर तुमची दृष्टी वक्र होईल. ही दृष्टी ज्यावरही पडेल त्यांचं अशुभ होईल.

शनिच्या दर्शनामुळे भगवान गणेशाचे मस्तक कापले गेले होते

पौराणिक आख्यायिकेनुसार, शनिच्या वक्र दृष्टीमुळे गणेशजींचे मस्तक शरीरापासून वेगळे झाले होते. यामागे एक कथा आहे. जेव्हा देवी पार्वतीने आपल्या उबटनापासून गणेशाला बनविले, तेव्हा शिवलोकमध्ये एक उत्सव झाला. सर्व देवता गणेशाला आशीर्वाद देण्यासाठी आले होते. त्यावेळी, शनिदेव गणेशाला न पहाता तेथून परत जाऊ लागले. तेव्हा देवी पार्वती म्हणाली की, शनिदेव तू माझा मुलाला पाहणारही नाहीस. शनिदेव म्हणाले की माझे पाहणे शुभ नाही. तेव्हा देवी पार्वती म्हणाली की तुला माझा मुलगा होण्याचा कदाचित आनंद झालेला नाही. परंतु हा माझा आदेश आहे की तू माझ्या मुलाला पाहावे आणि त्याला आशीर्वाद द्यावे. त्यानंतर शनिदेवाने आपल्या देवीच्या आज्ञेचे पालन केले आणि गणेशावर दृष्टी टाकली.

मान्यता आहे की, शनिदेवांच्या दर्शनानंतरच गणेशजींचा शिरच्छेदाची घटना घडली आणि गणेशजींना हत्तीचे मस्तक लावण्यात आले. यानंतर गणेशजींना गजानन म्हटले जाऊ लागले.

Who Cursed Shanidev And Why People Should Not Contact With Eyes Of Shanidev Know This Unknown Katha

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

शनिचे दुष्परिणाम, राहू-केतूच्या वक्रदृष्टीपासून वाचायचं असेल तर शनिवारचा उपवास करा, जाणून घ्या पद्धत आणि महत्व आणि फायदे

Saturday Astro Tips | शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी शनिवारी ‘या’ वस्तू दान करा

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI