AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shani Pooja Rules : तांबे की लोखंड, शनिदेवाच्या पूजेसाठी कोणते भांडे आहे योग्य? 99 टक्के लोक करतात चूक

शनिदेवाच्या पूजेमध्ये तांब्याची भांडी का वापरू नयेत? सूर्य आणि शनीच्या वैरामागचे नेमके कारण आणि पूजेचे योग्य नियम जाणून घ्या या सविस्तर लेखात.

Shani Pooja Rules : तांबे की लोखंड, शनिदेवाच्या पूजेसाठी कोणते भांडे आहे योग्य? 99 टक्के लोक करतात चूक
Shani
| Updated on: May 09, 2026 | 11:26 AM
Share

हिंदू धर्मशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार शनिवार हा दिवस न्यायदेवता शनिदेवाला समर्पित केला जातो. प्रत्येक व्यक्तीच्या कर्मांनुसार त्यांना फळ देणे हे शनिदेवाचे कार्य मानले जाते. ज्या व्यक्तींच्या कुंडलीत साडेसाती किंवा अडीचकी सुरू आहे, त्यांच्यासाठी शनिवारची पूजा ही वरदान मानली जाते. मात्र, अनेकदा भक्तीच्या ओघात आपण अशा काही चुका करतो, ज्यामुळे पूजेचे पूर्ण फळ मिळण्याऐवजी शनिदेवाच्या क्रोधाला सामोरे जावे लागू शकते. अनेकदा शनिदेवाच्या पूजेत तांब्याची भांडी वापरू नयेत असा सल्ला दिला जातो. पण आज आपण यामागे नेमकं कारण काय असते हे जाणून घेऊया.

सूर्य-पुत्र असूनही तांब्याला विरोध का?

सामान्यतः सर्व देव-देवतांच्या पूजेमध्ये तांब्याची भांडी अत्यंत शुभ मानली जातात. मात्र, शनिदेवाच्या पूजेत तांब्याचा वापर वर्ज्य असण्यामागे एक महत्त्वाचे पौराणिक कारण आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक धातूचा संबंध एका विशिष्ट ग्रहाशी असतो. तांबे हा धातू सूर्यदेवाचे प्रतीक आणि त्याच्याशी संबंधित मानला जातो. पौराणिक कथांनुसार, शनिदेव हे सूर्यदेवाचे पुत्र असूनही त्यांच्यामध्ये प्रचंड वैचारिक मतभेद आणि शत्रुत्व आहे.

तर धार्मिक मान्यतेनुसार, शनिदेवाच्या पूजेत त्यांच्या शत्रू ग्रहाचा (सूर्य) धातू म्हणजेच तांबे वापरल्यास शनिदेव रुष्ट होतात. यामुळेच शनिदेवाच्या मूर्तीला तांब्याच्या कलशाने अभिषेक करणे किंवा तांब्याच्या ताटात नैवेद्य दाखवणे वर्ज्य मानले गेले आहे. असे केल्यास पूजेचा लाभ मिळण्याऐजी जीवनात अडचणी येऊ शकतात.

शनिदेवाचा प्रिय धातू कोणता?

  • शनिदेव हे कष्ट आणि शिस्तीचे प्रतीक आहेत. ज्योतिषशास्त्रात लोखंडाला शनिदेवाचा कारक मानले जाते. त्यामुळे पूजेत धातूंची निवड करताना खालील गोष्टी लक्षात घ्याव्यात:
  • शनिदेवाची पूजा करताना नेहमी लोखंडी भांड्यांचा किंवा दिव्याचा वापर करणे अत्यंत श्रेयस्कर ठरते.
  • लोखंडाच्या भांड्यात मोहरीचे तेल घेऊन त्यात स्वतःचे प्रतिबिंब पाहून ते दान केल्यास (छाया दान) साडेसातीचा त्रास कमी होतो.
  • जर लोखंडी भांडी उपलब्ध नसतील, तर स्टीलची भांडी वापरणे चालू शकते, परंतु तांबे पूर्णपणे टाळण्याचा सल्ला दिला जातो.

शनि देवाची पूजा कशी करावी?

  • केवळ धातूच नाही, तर शनिदेवाची पूजा करताना खालील गोष्टींचे भान ठेवणे आवश्यक आहे:
  • शनिदेवाच्या डोळ्यांत थेट बघून पूजा करू नये, त्यांच्या चरणांकडे पाहून प्रार्थना करावी.
  • शनिदेवाचे मंदिर किंवा पूजा करताना पश्चिमेकडे तोंड करून बसणे शुभ मानले जाते.
  • शनिवारी पूजा करणाऱ्यांनी खोटे बोलणे, कोणाचा अपमान करणे किंवा तामसी आहार घेणे टाळावे.
  • अशा प्रकारे, शास्त्रोक्त नियमांचे पालन करून केलेली शनिपूजा जीवनातील संकटे दूर करून सुख-समृद्धी प्रदान करते.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
अखेर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBI FIR दाखल; संशयितांच्या यादीत...
अखेर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBI FIR दाखल; संशयितांच्या यादीत मोठी नावे
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत,
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत, खास काय?
मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजी
Ganpati Bappa Morya | मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजीरवाडी मंडळात दर्शन
गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील ...
Sanjay Raut | गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील हुकूमशाही...
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली..
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली बाप्पांची मूर्ती
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव...
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव शंकर थीम ठरतेय आकर्षण
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश,
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश, ट्वीट करत दिल्या शुभेच्छा
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित