Dussehra2021 | निरोगी आरोग्यासाठी दसऱ्याच्या दिवशी खातात पान, काय आहे यामागील वैज्ञानिक, धार्मिक महत्त्व

भारतीय संस्कृतीत सुपारीला खूप महत्व आहे. सुपारीचा उपयोग कोणत्याही शुभ कार्यासाठी किंवा पूजा पाठ करताना केला जातो. मात्र, तुम्हाला माहिती आहे का? ही सुपारी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

Dussehra2021 | निरोगी आरोग्यासाठी दसऱ्याच्या दिवशी खातात पान, काय आहे यामागील वैज्ञानिक, धार्मिक महत्त्व
Paan
| Edited By: | Updated on: Oct 15, 2021 | 11:51 AM

मुंबई: विजयादशमी म्हणजे वाईटावर चांगल्याच्या विजयाचा सण. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मनले जाणाऱ्या या सणाच्या दिवशी पान खाण्याची परंपरा आहे. भारतीय संस्कृतीत सुपारीला खूप महत्व आहे. सुपारीचा उपयोग कोणत्याही शुभ कार्यासाठी किंवा पूजा पाठ करताना केला जातो. मात्र, तुम्हाला माहिती आहे का? ही सुपारी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. अशक्तपणा, पचन आणि बद्धकोष्ठता या आजारांपासून मुक्त होण्यासाठी सुपारी प्रभावी मानली जाते. दसऱ्याच्या दिवशी सुपारी खाण्याचे काही वैज्ञानिक आणि काही धार्मिक महत्त्व आहे.

दसऱ्याच्या दिवशी सुपारी का खावी, जाणून घ्या ही 5 कारणे

1. पान हे प्रेम आणि विजयाचे प्रतीक मानले जाते. त्याच दिवशी, विड्याला ही विशेष महत्त्व आसते, वाईटावर चांगल्याचा मात या संकल्पनेनेच दसऱ्याच्या दिवशी रावणाच्या दहनानंतर सुपारी खाल्ली जाते.

2. दसऱ्याला पान खाण्याचे एक कारण म्हणजे वर्षाच्या या वेळी हवामानात बदल होतो, ज्यामुळे संसर्गजन्य रोगांचा धोका वाढतो. अशा स्थितीत सुपारी खाणे आरोग्यासाठी चांगले असते, ते सर्व प्रकारच्या संसर्गजन्य रोगांपासून आपले रक्षण करते. अनेक लोक नवरात्रीमध्ये 9 दिवस उपवास करतात. हे स्पष्टपणे पाचन तंत्रावर परिणाम करते. अशा परिस्थितीत पान खाल्ल्याने अन्न पचवणे सोपे होते.

४. दसऱ्याच्या दिवशी असत्यावर सत्याचा विजय म्हणून आपण रावन दहन करतो. पण या आधी हनुमानाला पानाचा प्रसाद दाखवला जातो.

5. दसऱ्याच्या दिवशी पान खाण्याच्या परंपरेबद्दल, शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की ज्याप्रमाणे चैत्र नवरात्रीमध्ये नऊ दिवस खडी साखर, कडुलिंबाची पाने आणि काळी मिरी खाण्याची परंपरा आहे, त्यांच्या सेवनाने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

 

इतर बातम्या :

Dussehra2021 | फुलांचा दरवळ, भक्तीचा नाद, दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर महाराष्ट्रातील आराध्य दैवतांचे गाभारे सजले

Chanakya Niti | कोणत्या प्रकारच्या मित्रांना लांब ठेवावं म्हणजे अपयश येणार नाही? चाणक्यांनी कुंडली मांडली

मजबूत फुफ्फुसांपासून शरीराच्या अतिसूजेपर्यंत, वाचा शंख फुकण्याचे आश्चर्यकारक फायदे