वधू गृहप्रवेशावेळी तांदळाने भरलेलं माप का ओलांडते? काय आहे त्यामागील खास कारण
लग्नातील आणि लग्नानंतरच्या सर्वच विधी या महत्त्वाच्या मानल्या जातात. त्यातील एक म्हणजे गृहप्रवेशावेळी वधू तांदळाचे माप ओलांडते. पण त्यामागे नेमकं कारण काय आहे? हा विधी वधुसाठी सोबतच तिच्या सासरच्या घरासाठी का महत्त्वाचा असतो हे जाणून घेऊयात.

सध्या लग्नाचा हंगाम सुरू आहे. सर्वत्र बँड, सजवलेले मंडप आणि लग्नाच्या मिरवणुकी आहेत. हिंदू कॅलेंडरनुसार, नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा काळ शुभ लग्नाच्या तारखांचा काळ मानला जातो. दरम्यान लग्नाच्या प्रत्येक विधीमध्ये एक खोल अर्थ दडलेला आहे. लग्नात केल्या जाणाऱ्या प्रत्येक विधी आणि रीतीरिवाजाला एक महत्त्व आहे. असाच एक विधी म्हणजे गृहप्रवेश समारंभाचा. गृहप्रवेशावेळी वधू तांदळाने भरलेलं माप ओलांडते. आणि मग ती सासरच्या घरात प्रवेश करते. पण त्यामागील खास कारण काय आहे? तसेच माप ओलांडताना त्यात तांदुळच का भरले जातात. चला जाणून घेऊयात.
वधू उजव्या पायाच्या अंगठ्याने तांदळाने भरलेले माप ओलांडते
पारंपारिकपणे, लग्नानंतर जेव्हा वधू पहिल्यांदाच तिच्या सासरच्या घरात पाऊल ठेवते तेव्हा ती केवळ एक नवीन जागा नसते, तर एका नवीन जीवनाची, नवीन जबाबदाऱ्यांची आणि नवीन नातेसंबंधांची सुरुवात असते. जेव्हा वधू घरात प्रवेश करते आणि तिच्या उजव्या पायाच्या अंगठ्याने तांदळाने भरलेले माप ओलांडते. त्यामागील एक कारण म्हणजे घरात येणारी ती मुलगी, सून लक्ष्मीच्या रुपात येते. येताना घरात सुख, समृद्धी, अन्न, लक्ष्मीचा आशीर्वाद आणि सौभाग्य घेऊन येत असल्याचं म्हटलं जातं. याचा अर्थ तिच्या आगमनाने घर सफळ-संपूर्ण झाले आहे असे म्हटले जाते. ज्याप्रमाणे देवी लक्ष्मी घरात प्रवेश करते, त्याचप्रमाणे नवीन सून तिच्या नवीन कुटुंबात शुभ आणि समृद्धी आणते असे मानले जाते.
वधू ही देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे
परंपरेनुसार, या विधीत तांदूळ आणि भांडे हे समृद्धी आणि संपत्तीचे प्रतीक आहेत. म्हणूनच, ते प्रतीक आहे की ज्या घरात नवीन वधू प्रवेश करते त्या घरात कधीही अन्न, संपत्ती आणि आनंदाची कमतरता भासणार नाही. अशाप्रकारे, तांदळाचे माप ओलांडणे हा केवळ एक विधी नाही तर वधूच्या गृहलक्ष्मी रूपाचा सन्मान करण्याचा आणि समृद्धीच्या आगमनाचे शुभ प्रतीक मानले जाते.
विधीचे महत्त्व
हिंदू धर्मात, गृहप्रवेश समारंभात वधूने तिच्या पायाने तांदळाचे भांडे टाकण्याची परंपरा खूप प्राचीन आहे. सामान्य प्रसंगी पायाने अन्नाला स्पर्श करणे अशुभ मानले जात असले तरी, या प्रसंगी हे कृत्य शुभ मानले जाते. गृहप्रवेश समारंभात जेव्हा नववधू तिच्या उजव्या पायाने तांदळाच्या भांड्यावर हलकेच लाथ मारते तेव्हा ते देवी लक्ष्मीचे स्वागत करत असल्याचे दर्शवते. शास्त्रांनुसार, स्त्रीला देवीचे स्वरूप मानले जाते आणि म्हणूनच, तिचे शुभ पाऊल सकारात्मक ऊर्जा आणि शुभतेचा स्रोत मानले जाते.
