चिता जळाल्यानंतरच्या राखेवर 94 हा क्रमांक का लिहितात… कारण ऐकून झोपच उडेल
Kashi Manikarnika Ghat : प्रत्येकाच्या आयुष्यात मृत्यू अंतिम सत्य आहे आणि हे सांगण्यासाठी बाबा महाकाल यांच्या आरतीसाठी अंत्यसंस्काराच्या राखेचा वापर केला जातो. आपण अंत्यसंस्काराच्या राखेनं '94' का लिहिलं जातं... यामागे काय रहस्य आहे जाणून घेऊ...

Kashi Manikarnika Ghat : मृत्यू कोणाला चुकलेला नाही. आपण अनेकांना म्हणजे कर्माची फळं भोगणार… पण हे काही आहे ते कर्मावर निर्भर आहे… असं देखील सांगितलं जातं. अशात मृत्यूनंतर मोक्ष मिळावा यासाठी अनेक विधी देखील करण्यात येतात. पण भारतात असं एक ठिकाणी जिथं अंत्यसंस्कार केल्यानंतर मोक्ष मिळतं असं म्हणतात. काशीला मोक्ष देणारी नगरी म्हटले जाते, म्हणूनच मृत्यूनंतर लोक अंत्यसंस्कारासाठी दूरदूरून येथे येतात.
असं म्हटलं जातं की, प्राचीन काळी, राजा हरिश्चंद्र यांचे मणिकर्णिका घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते आणि तेव्हापासून, याठिकाणी कायम चिता जळत असते. येथे दिवसाचे 24 तास वर्षातले 365 दिवस चिता जळत असते. म्हणून याला महास्मशान असं देखील म्हणतात. एवढंच नाही तर, होळीच्या दिवशी राखेने येथे होळी खेळली जाते… येथे जळणाऱ्या चितेच्या राखेत ’94’ लिहिण्याचे रहस्य सध्या चर्चेत आहे. मणिकर्णिका घाटावरील लोक चितेच्या राखेत ’94’ हा विशेष आकडा का लिहित आहेत?
मृतदेहाच्या अंतिम संस्कारानंतर, म्हणजेच चिता थंड झाल्यानंतर, त्याची राख गंगा नदीत विसर्जित केली जाते. मणिकर्णिका घाटावरील अंत्यसंस्काराच्या वेळी, पुजारी आणि स्थानिक लोक राखेचे विसर्जन करण्यापूर्वी त्यांच्या बोटांनी त्यावर “94” लिहितात. पण, हे रहस्य बाहेरील लोकांना माहीत नाही. सोशल मीडियावर याचं कारण आणि रहस्य विचारण्यात येत आहे.
राखेत का लिहितात ’94’?
याचं रहस्य मृत्यू आणि कर्माशी जोडलं गेलं आहे. गितेत उल्लेख करण्यात आला आहे की, व्यक्तीच्या जीवनात एकून 100 कर्म असतात, ज्याचा जीवनावर आणि नंतरच्या जीवनावर परिणाम होतो. यापैकी 94 कर्म मानवी नियंत्रणाखाली आहेत, त्यात नैतिक, सामाजिक आणि आध्यात्मिक कृती आहेत. तर उर्वरित 6 कर्म – जीवन, मृत्यू, यश, अपयश, लाभ आणि हानी हे भगवान ब्रह्मा यांच्या हातात आहेत, ज्या मानवांच्या नियंत्रणाबाहेर आहेत. मृत्यूनंतर, जेव्हा शरीराची चेतना निघून जाते, तेव्हा मन पाच इंद्रिये सोबत घेऊन जाते. म्हणजेच, सहा गोष्टी नष्ट होतात.
अंत्यसंस्कारात, चितेच्या ज्वाला या 94 नियंत्रित कर्मांना जाळून राख करतात, जे मोक्षाच्या दिशेने एक प्रतीकात्मक प्रवास दर्शवते. बाकी 6 देवावर सोडून दिले जातात. अशा परिस्थितीत, चितेच्या राखेवर ’94’ लिहिणं हा एक प्रकारचा मुक्तीचा मंत्र आहे.
याचा अर्थ असा की व्यक्तीसा आता सर्व अडथळ्यांपासून मुक्ती हवी असून मोक्ष हवं आहे. काशीचे स्थानिक लोक याचा अर्थ एक मूक संदेश म्हणून करतात: “तुम्ही या जीवनात जे करू शकलात ते केलं आहे. बाकी सर्व काही आता देवाच्या हातात आहे.”
