AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फक्त महाकालच नाही तर ‘या’ पाच कारणांसाठी उज्जैन आहे हिंदूंसाठी महत्वाचे तीर्थक्षेत्र

उज्जैन हे बाबा महाकालच्या मंदिरामुळे तर प्रसिद्ध आहेच शिवाय आणखी काही गोष्टी आहेत ज्यामुळे या शहराला महत्त्व प्रदान झाले आहे.

फक्त महाकालच नाही तर 'या' पाच कारणांसाठी उज्जैन आहे हिंदूंसाठी महत्वाचे तीर्थक्षेत्र
उज्जैन Image Credit source: Social Media
| Updated on: Oct 11, 2022 | 3:25 PM
Share

उज्जैन,  उज्जैन (Ujjain) हे हिंदू धर्मीयांसाठी महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. बाबा महाकालचे (Mahakal) हे शहर अतिशय प्राचीन आणि ऐतिहासिक आहे, ज्याचा इतिहास 5000 वर्षांहून अधिक जुना आहे. अग्नि पुराण (Agni Puran) आणि गरूण पुराणात (Garud Puran) याला मोक्ष आणि भक्ती-मुक्ती असे म्हटले आहे. प्राचीन काळी या शहराला उज्जयिनी म्हणत. हजारो वर्षांपासून हे केवळ सभ्यतेचे आकर्षणाचे केंद्रच नाही तर संस्कृतीच्या अनेक प्रवाहांचा संगम आहे. महाकाल व्यतिरिक्त, या शहराला धार्मिक वलय प्रदान करणारी अनेक कारणे आहेत, ते कसे ते जाणून घेऊया.

  1. पृथ्वीचे केंद्र: असे मानले जाते की, उज्जैन हे पृथ्वीच्या केंद्रस्थानी आहे. येथून पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणारी कर्क रेषा जाते, तर उत्तरेला सुमेरूपासून लंकेकडे जाणारी शून्य रेषाही येथून जाते. ज्योतिषशास्त्र, सूर्यसिद्धांत आणि सिद्धांत शिरोमणी या ग्रंथांमध्ये या नगरीचे वर्णन पृथ्वीच्या नाभीवर वसलेले आहे. सूर्यसिद्धांताचे भाषांतरकार ई. बर्जेस यांनी लिहिले आहे की, आज ग्रीनविचला जे वैभव प्राप्त झाले आहे, तेच वैभव प्राचीन काळी उज्जैनला होते. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातून हे खूप महत्वाचे आहे.
  2. शिप्रा नदी : उज्जैन शहर शिप्रा नदीच्या काठावर आहे, ती मोक्षदायिनी नदी मानली जाते, पुराणातही याचा उल्लेख आहे, असे सांगितले जाते की समुद्रमंथनाच्या वेळी कलशातून अमृत सांडले होते, त्या चार  शहरांमध्ये कुंभ मेळा आयोजित केला जातो, त्यापैकी एक उज्जैन आहे.
  3. देवांची नगरी : उज्जैनला देवांची नगरी म्हटले जाते, याचा उल्लेख स्कंद पुराणातही आहे. ते मंगल गृहाचे उगमस्थानही मानले जाते. स्कंद पुराणानुसार येथे 84 महादेव, 64 योगिनी, 8 भैरव व 6 विनायक मंदिरे आहेत.अग्नि पुराणात या नगरीचे वर्णन मोक्षदाता म्हणून केले आहे. कालिदासांनी आपल्या कृतींमध्ये उज्जैन शहराचे वर्णन स्वर्गाचा पडलेला भाग म्हणून केले आहे.
  4. ज्योतिषशास्त्रीय महत्त्व : उज्जैनला वैज्ञानिकदृष्ट्याही महत्त्व आहे, हे शहर ज्योतिषशास्त्राचे उगमस्थान मानले जाते, ज्योतिषशास्त्राची उत्पत्ती आणि विकास याच शहरात झाल्याचा उल्लेख धर्मग्रंथांमध्ये आढळतो. भारतातील आणि परदेशातील ज्योतिष गणना पद्धती हे उज्जैनचेच योगदान आहे.
  5. चक्रवर्ती सम्राट विक्रमादित्यचे शहर: उज्जैन हे चक्रवर्ती सम्राट विक्रमादित्यचे शहर आहे, गीताप्रेस गोरखुपर या पुस्तकातील भविष्य पुराणानुसार, 101 ईसा पूर्व, सम्राट विक्रमादित्यचा जन्म झाला, त्याने या शहरावर 100 वर्षे राज्य केले. इथे विक्रमादित्यानंतर राजा त्याच्यासारखा न्यायी आणि पराक्रमी असेल तरच राज्य करू शकतो. उज्जैनचा एकच राजा आहे, बाबा महाकाल, कोणीही राजा येथे राहत नाही, असे म्हणतात की जो राजा येथे राहतो, तो सत्यनिष्ठ आणि न्यायी नसेल तर त्याच्या आयुष्यात संकटे येतात.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.