जर चपाती बनवताना तुम्ही पण हीच चूक करत असाल तर ती ताबडतोब दुरुस्त करा, अन्यथा येतील अनेक अडचणी
वास्तुशास्त्रानुसार जेवण बनवताना अशा बऱ्याच गोष्टी असताता ज्या करणे टाळले पाहिजे जेणेकरून त्याचा आयुष्यावर विपरीत परिणाम होणार नाही. विशेषत: चपाती किंवा रोटी बनवताना काही नियम हे कटाक्षाने पाळले पाहिजेत. अन्यथा त्यामुळे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागू शकते.

वास्तुशास्त्रानुसार घराच्या सुख-समृद्धीचे रहस्य हे घरातील आपल्या काही कृतींवरच अवलंबून असते. जर आपण वास्तुशास्त्रानुसार दिलेले नियम पाळले तर नक्कीच बऱ्याच अडचणी आपण दूर करू शकतो. परंतु काही लोक या सूचनांचे पालन करतात तर काही दुर्लक्ष करतात.वास्तुशास्त्रानुसार अजून एक गोष्ट महत्त्वाची सांगितली आहे ती म्हणजे जेवण बनवण्याची पद्धत. त्यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. अनेकदा घरातील एखाद्या मोठ्या व्यक्तीकडून हे ऐकले असेल की चपाच्या बनवताना कधीही मोजून बनवून नयेत. तसेच, पहिली आणि शेवटची रोटी स्वतः खाऊ नये आणि त्याशिवाय तीन रोट्या एकत्र वाढू नयेत. असे बरेच नियम आपण ऐकले असतील. वास्तुशास्त्रात असे करण्यामागे अनेक विशेष कारणे सांगितली गेली आहेत त्याबद्दल आपण जाणून घेऊयात.
चपाती मोजू नये
वास्तुशास्त्रानुसार, चपाती बनवताना कधीही संख्या मोजू नये. असे म्हटले जाते की मोजून चपात्या किंवा रोट्या बनवल्या जातात तेव्हा अन्नाचा अपमान मानला जातो. लोक अनेकदा ही चूक करतात. पण असे न करता अंदाजानेच मोजक्या चपात्या बनवता येतात.
पीठ मळल्यानंतर त्यावर बोटांचे ठसे
अनेकदा असे दिसून येते की स्त्रिया पीठ मळल्यानंतर त्या कणकेवर बोटांचे ठसे सोडतात. वास्तुशास्त्रानुसार हे करणे गरजेचे कारण जर बोटांचे ठसे न सोडता जर तो पिठाचा गोळा मळला तर ते पित्रांना दाखवण्यात येणारा नैवद्याप्रमाणे मानले जाते त्यासाठी पीठ मळल्यानंतर कणकेवर बोटांचे ठसे उमटवणे गरजेचे आहे.
पहिली आणि शेवटची चपाती, रोटी खाऊ नये
पहिली चपाती ही कायम गायीला अर्पण करावी असे म्हटले जाते. आजही काही लोक हा नियम पाळतात. वास्तु आणि ज्योतिषशास्त्रानुसार, पहिली चपाती गायीला आणि शेवटची चपाती कुत्र्याला अर्पण करावी. यामुळे जीवनात सकारात्मक बदल होतात.
चपाती बनवल्यानंतरही हे काम करू नका
बरेच लोक चपाती बनवल्यानंतर तवा उलटा ठेवतात, परंतु वास्तुनुसार असे करणे अशुभ मानले जाते. असे म्हटले जाते की तवा कधीही उलटा ठेवू नये, कारण त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते. तवा स्वच्छ केल्यानंतर तो चुलीवरून काढून सरळ ठेवावा. तसेच आर्थिक हानी होण्याचे संकेत मानले जातात.
कधीही 3 चपाती किंवा रोट्या एकत्र वाढू नयेत
वास्तु आणि ज्योतिषशास्त्रानुसार, एका जेवणाच्या ताटात तीन रोट्या किंवा चपाती कधीही एकत्र वाढू नयेत. कारण तोही एक प्रकारे पित्रांचा नैवद्य मानला जातो. कारण पित्राना वाहताना नेहमी तीन चपाती किंवा रोट्यांचा मान दिला जातो. त्यासाठी ताटात आधी 2 चपाच्या वाढाव्यात आणि नंतर लागल्यास नंतर ताटात ठेवल्या तरी चालतील.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आली आहे. तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा नाही)
