Horoscope 5 May 2022: आध्यात्मिक कार्यातील तुमची रूची तुमचे वर्तन अधिक सकारात्मक करेल, दिनक्रमावर नियंत्रण ठेवा

आध्यात्मिक कार्यातील तुमची रूची तुमचे वर्तन अधिक सकारात्मक करेल.

Horoscope 5 May 2022: आध्यात्मिक कार्यातील तुमची रूची तुमचे वर्तन अधिक सकारात्मक करेल, दिनक्रमावर नियंत्रण ठेवा
आध्यात्मिक कार्यातील तुमची रूची तुमचे वर्तन अधिक सकारात्मक करेल
Image Credit source: TV9 Marathi
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सिद्धेश सावंत

May 05, 2022 | 6:05 AM

आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल ? आजचे तारे काय सांगतात. दैनिक राशी भविष्याद्वारे आजचे राशी भविष्य आणि दिवसातील घडामोडीची माहिती जाणून घ्या.

मुंबई: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीची रास त्याच्या जन्मतारीख आणि जन्मवेळेवर आधारित असते. ज्योतिषशास्त्रात (Astrology)त 27 नक्षत्र, 9 ग्रह आणि 12 राशींचे वर्णन केले आहे. याआधारावर व्यक्तीची रास (Zodiac) ठरवली जाते. आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? आजचे तारे काय म्हणतात? दैनिक राशिभविष्याद्वारे आजचे राशीभविष्य आणि संपूर्ण दिवसातील घडामोडींची माहिती जाणून घेवूया.

‘बृहस्पतिवार, 5 मे 2022’

कर्क

गेल्या काही दिवसांपासून ज्याकामासाठी तुम्ही मेहनत करत आहात, आज त्याकामाचे फळ अपेक्षेपेक्षा चांगले मिळू शकते. कोणतंही काम करण्याआधी त्याचा सर्व बाजूंनी विचार करा. घर, गाडीचे कागदपत्र संभाळून ठेवा. कल्पना करण्यासोबत त्या प्रत्यक्षात उतरविण्यासाठी प्रयत्न करा. तणाव असेल तर मोटिव्हेशनल प्रोग्राम तुमच्यासाठी लाभदायक ठरतील.

व्यवसायिक कामात कोणत्याही व्यक्तिवर विश्वास ठेवू नका. सर्व निर्णय स्वत: घ्या. मनापासून आपल्या कामाप्रति मेहनत घ्या. लाभाचे मार्ग अधिक सोप्पे होतील. नोकदार लोकांमध्ये कामाच्या व्यापामुळे तणाव राहिल.

लव फोकस – नवरा बयको मधील संबंधात सामंजस्य राहिल. प्रेम संबंधात मधुरता राहिल. खबरदारी – कफ, गॅस सारख्या समस्या टाळण्यासाठी असंतुलित अन्न आणि पेय घेऊ नका शुभ रंग – आकाशी भाग्यवान अक्षर – व अनुकूल क्रमांक – 5

सिंह

गेल्या काही काळापासून सुरू असलेल्या अशांत दिनक्रमामुळे आज थोडा वेळ मिळेल. कैटुंबिक तसेच आर्थिक कामात घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयाचे सकारात्मक परिणाम समोर येतील. तरूण मुलांना इंटरव्ह्यू मध्ये योग्य यश मिळण्याची संभावना आहे. पैश्याच्या बाबतीत काही चिंता असू शकातात. पण पण धीर धरा, दुपारनंतर ग्रहस्थिती अनुकूल राहील. या काळात तुमच्या वैयक्तिक कामात व्यस्त रहा. गरज नसलेल्या गोष्टीत लक्ष दिल्यास ताण तणाव वाढेल.

नोकरीच्या ठिकाणी तुमचा मान संन्मान राहिल. पण, एखाद्या सहकाऱ्याचे नकारात्मक वागणे तुम्हाला त्रासदायक वाटू शकते. त्यामुळे सर्व कामं देखरेखी खाली करून घ्या. नविन तसंच अनोळखी लोकांवर विश्वास ठेवल्याने नुकसान होण्याची शक्यता आहे.

लव फोकस – दांपत्य जीवन सुखमय राहिल. घरामध्ये देखील परस्पर प्रेम आणि सौहार्द कायम राहील. खबरदारी – गुडघे आणि सांधेदुखीचा त्रास होईल. यासाठी आयुर्वेदिक उपचार सर्वोत्तम ठरतील शुभ रंग – लाल भाग्यवान अक्षर –अनुकूल क्रमांक – 7

कन्या –

धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यातील तुमची रूची तुमचे वर्तन अधिक सकारात्मक करेल. मीडिया तसंच मार्केटिंग संबंधित माहिती अधीक वाढवा. त्याने तुम्हाला तुमच्या कामाला नवी दिशा मिळेल. गुंतवणुकीच्या कामात सावधानी बाळगा. अनोळखी लोकांना पैसे उधार देऊ नका आणि त्याच्यावर विश्वास ठेवू नका. गैरसमजामुळे काही नात्यांत दुरावा येण्याची शक्यता आहे. जर व्यवसायासंबंधई कोणते कायदेशीर विवाद सुरू असतील, तर आज त्याचे सकारात्मक परिणाम येतील. कार्यालयात योजनाबद्ध कामं होतील. पण नोकरदार वर्गात त्यांच्या कामाच्या ठिकाणी काही अडचणींमुळे तणावात राहतील.

लव फोकस – वैवाहिक जीवनात कटुता येऊ देऊ नका. कारण मतभेदाचा परिणाम कुंटूबावर राहिल.

खबरदारी – तलकट खाल्याने रक्तदाब आणि पोट बिघडण्याची शक्यता. दिनक्रमावर नियंत्रण ठेवा. शुभ रंग – हिरवा भाग्यवान अक्षर –अनुकूल क्रमांक – 6

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें