AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IndvsAus : ऑस्ट्रेलिया सुस्थितीत, शेपूट गुंडाळण्याचं भारताला आव्हान

पर्थ: भारताविरुद्धच्या दुसऱ्या पर्थ कसोटी टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसअखेर 6 बाद 277 धावांची मजल मारली आहे. खेळ थांबला तेव्हा टीम पेन 16 आणि पॅट कमीन्स 11 धावांवर खेळत होते. भारताकडून हनुमा विहारी आणि इशांत शर्माने प्रत्येकी दोन तर जसप्रीत बुमराह आणि उमेश यादवने प्रत्येक एक विकेट घेतली. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनने टॉस […]

IndvsAus : ऑस्ट्रेलिया सुस्थितीत, शेपूट गुंडाळण्याचं भारताला आव्हान
| Updated on: Jul 05, 2019 | 4:50 PM
Share

पर्थ: भारताविरुद्धच्या दुसऱ्या पर्थ कसोटी टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसअखेर 6 बाद 277 धावांची मजल मारली आहे. खेळ थांबला तेव्हा टीम पेन 16 आणि पॅट कमीन्स 11 धावांवर खेळत होते. भारताकडून हनुमा विहारी आणि इशांत शर्माने प्रत्येकी दोन तर जसप्रीत बुमराह आणि उमेश यादवने प्रत्येक एक विकेट घेतली.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनी हा निर्णय योग्य ठरवला. अॅरॉन फिंच आणि मर्कस हॅरिसने शतकी भागीदारी करुन दमदार सलामी दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 112 धावांची भागीदारी रचली. फिंचला (50) बुमराने  पायचित करुन ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. त्यानंतर हॅरिसच्या साथीला आलेल्या उस्मान ख्वाजाला उमेश यादवने अवघ्या 5 धावांवर माघारी धाडलं. मग संघाची धावसंख्या 134 झाली असताना हनुमा विहारीने हॅरिसचा अडथळा दूर केला. हॅरिसने 70 धावा केल्या. यानंतर पीटर हॅण्डस्कोम्बची विकेट इशांत शर्माने काढली. 7 धावांवर विराट कोहलीने त्याचा झेल टिपला.

यानंतर शॉन मार्श आणि टीम हेडने पडझड रोखली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 85 धावांची दमदार भागीदारी केली. शॉन मार्शचा अडथळा हनुमा विहारीनेच दूर केला. मार्शने 45 तर हेडने 58 धावा केला. हेडचा काटा इशांत शर्माने काढला.

आता दुसऱ्या दिवशी लवकरात लवकर ऑस्ट्रेलियाचं शेपूट गुंडाळण्याचं आव्हान भारतीय गोलंदाजांसमोर असेल.

पहिला सामना 31 धावांनी जिंकणाऱ्या भारतीय संघाला दुखापतीचं ग्रहण लागलं आहे. त्यामुळे पर्थ कसोटीसाठी भारतीय संघात दोन बदल करण्यात आले आहेत. भारताचा हुकमी फिरकीपटू आर अश्विन आणि हिटमॅन रोहित शर्माऐवजी अष्टपैलू हनुमा विहारी आणि मध्यमगती गोलंदाज उमेश यादवला संघात स्थान देण्यात आलं आहे. दरम्यान या कसोटीत विजयी आघाडी कायम राखण्याचं टीम इंडियासमोर आव्हान आहे.

आर अश्विनने पहिल्या कसोटीत दमदार कामगिरी करत, भारतीय विजयात मोठा वाटा उचलला होता. मात्र दुखापतीमुळे त्याला दुसऱ्या कसोटीतून बाहेर व्हावं लागल्याने भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. दुसरीकडे दुखापतग्रस्त पृथ्वी शॉ पूर्णत: बरा न झाल्याने तो संघात पुनरागमन करु शकला नाही. वाचा:  पृथ्वी शॉ पहिले दोन कसोटी सामने मुकणार 

या सामन्यात भारताची फलंदाजीची मदार आघाडीच्या सहा फलंदाजांवर असेल. पहिल्या कसोटीत चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे वगळता अन्य कोणत्या खेळाडूला मोठी खेळी करता आली नव्हती. त्यामुळे भारतीय फलंदाजांचा फॉर्म परतणं आवश्यक आहे. दुसरीकडे अश्विनच्या अनुपस्थितीत वेगवान माऱ्यावर भारतीय गोलंदाजीची मदार असेल.

भारतीय संघ: विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, के एल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, ऋषभ पंत (विकेटकीपर), ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि उमेश यादव.

ऑस्ट्रेलिया दौऱ्याचं वेळापत्रक
कसोटी मालिका
पहिला सामना – 6 डिसेंबर
दुसरा सामना – 14 डिसेंबर
तिसरा सामना – 26 डिसेंबर
चौथा सामना – 3 जानेवारी
वन डे मालिका
पहिला सामना – 12 जानेवारी
दुसरा सामना – 15 जानेवारी
तिसरा सामना – 18 जानेवारी

ऑस्ट्रेलिया दौऱ्याचं वेळापत्रक कसोटी मालिका पहिला सामना – 6 डिसेंबर दुसरा सामना – 14 डिसेंबर तिसरा सामना – 26 डिसेंबर चौथा सामना – 3 जानेवारी वन डे मालिका पहिला सामना – 12 जानेवारी दुसरा सामना – 15 जानेवारी तिसरा सामना – 18 जानेवारी

संबंधित बातम्या 

अश्विन, रोहित शर्मा बाहेर, दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर  

पृथ्वी शॉ पहिले दोन कसोटी सामने मुकणार

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.