T20 World Cup : T20 विश्वचषकापुर्वी वेस्टइंडीजला झटका, वर्ल्ड रेकॉर्ड बनवणारा फलंदाज बॅन

महेश घोलप, Tv9 मराठी

|

Updated on: Oct 08, 2022 | 2:44 PM

विशेष म्हणजे जॉन कैंपबेल याने रक्त चाचणी करण्यास एप्रिल महिन्यात नकार दिला होता अशी माहिती एका वेबसाईटने दिली आहे.

T20 World Cup : T20 विश्वचषकापुर्वी वेस्टइंडीजला झटका, वर्ल्ड रेकॉर्ड बनवणारा फलंदाज बॅन
T20 विश्वचषकापुर्वी वेस्टइंडीजला झटका
Image Credit source: twitter

काही दिवसात T20 विश्वचषक (T20 World Cup) सुरु होणार आहे. त्यामुळे जेवढ्या टीम सहभागी होणार आहेत. त्यांनी आत्तापासून आपली तयारी सुरु केली आहे. वेस्टइंडिज (west indies) टीम सुद्धा मागच्या काही दिवसांपासून अधिक चर्चेत आहे. कारण त्याच्या खेळाडूंकडे (Player) कधीही चांगली कामगिरी करण्याची तयारी आहे.

जॉन कैंपबेल हा वेस्ट इंडिजचा खेळाडू आहे. त्याने आत्तापर्यंत अधिक चांगलं क्रिकेट खेळलं आहे. तसेच तो आक्रमक फटकेबाजीसाठी अधिक ओळखला जातो. पण T20 विश्वचषकापुर्वी त्याला बॅन करण्यात आलं आहे.

जॉन कैंपबेल याने कॅम्पबेलने डोपिंगविरोधी नियम मोडल्यामुळे त्याला 4 वर्षासाठी बॅन करण्यातं आलं आहे. त्यामुळे तो यंदाच्या आयपीएलमध्ये खेळताना दिसणार नाही.

हे सुद्धा वाचा

विशेष म्हणजे जॉन कैंपबेल याने रक्त चाचणी करण्यास एप्रिल महिन्यात नकार दिला होता अशी माहिती एका वेबसाईटने दिली आहे.

कॅम्पबेलने त्याच्या कारर्कीदीत 20 कसोटी, 6 एकदिवसीय सामने खेळले आहेत. विशेष म्हणजे, 2 टी-20 सामने सुद्धा खेळले आहेत. त्याने आयर्लंडविरुद्ध 179 धावांची स्फोटक खेळी केली होती.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI