आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पुनरागमनाबाबत ए बी डिव्हिलियर्सचा मोठा निर्णय

| Updated on: May 18, 2021 | 10:21 PM

दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू AB De Villiers आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आता परत येत असल्याची चर्चा सातत्याने होत आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पुनरागमनाबाबत ए बी डिव्हिलियर्सचा मोठा निर्णय
AB de Villiers
Follow us on

केप टाऊन : दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्सने (AB De Villiers) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर तो आता परत येत असल्याची चर्चा सातत्याने होत आहे. याचदरम्यान, क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात असे म्हटले आहे की, एबी डिव्हिलियर्सने निवृत्ती घेतली आहे आणि तो आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतणार नाही. (AB De Villiers Comeback : Cricket South Africa says he will not be coming out of International Retirement)

क्रिकेट मंडळाच्या वतीने असे सांगण्यात आले आहे की, डिव्हिलियर्सशी या विषयावर बोलणे झाले आहे. डिव्हिलियर्सने याबाबत म्हटले आहे की, त्याची निवृत्ती हा अंतिम निर्णय आहे आणि त्यात कोणताही बदल होणार नाही. म्हणजेच तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतणार नाही. डिव्हिलियर्सने 114 कसोटी, 224 वनडे आणि 78 टी – 20 सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिका संघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. त्यात त्याने अनुक्रमे 8,765, 9,577 आणि 1,672 धावा फटकावल्या आहेत. कसोटीत त्याच्या नावे 22 शतकं आणि 46 अर्धशतकं आहेत. तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने 25 शतकं आणि 53 अर्धशतकं झळकाली आहेत. डिव्हिलियर्स सध्या 37 वर्षांचा आहे.

डीव्हिलियर्सने 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली होती. त्यावेळी तो म्हणाला होता की, वर्कलोडमुळे मी आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडत आहे. पण जगभरातील टी -20 लीगमधील त्याच्या शानदार कामगिरीनंतर डिव्हिलियर्सच्या संघातील पुनरागमनाबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाच्या सध्याच्या खराब कामगिरीनंतर डीव्हिलियर्सला परत बोलवा, अशी मागणीदेखील क्रिकेट चाहते करत आहेत. 2019 च्या विश्वचषक स्पर्धेत जेव्हा दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्या फेरीतच स्पर्धेतून बाहेर पडला होता, तेव्हा स्पष्ट जाणवत होतं की, दक्षिण आफ्रिकेच्या संघात डीव्हिलियर्सची कमी जाणवतेय.

आयपीएलदरम्यान पुनरागमनाची चर्चा

क्रिकेट दक्षिण आफ्रिकेच्या वतीने असेही सांगण्यात आले होते की, डिव्हिलियर्सशी त्याच्या पुनरागमनाबद्दल चर्चा केली जाईल. त्यांच्या संमतीनंतरच पुढची पावले उचलली जातील. डिव्हिलियर्सने यंदा आयपीएलचा 14 वा हंगाम सुरु झाल्यानंतर एप्रिल 2021 मध्ये सांगितले होते की, टी -20 वर्ल्डकपपूर्वी त्याने जर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले तर ही मोठी गोष्ट सिद्ध होईल. ऑक्टोबर-नोव्हेंबर 2021 मध्ये भारतात टी -20 विश्वचषक स्पर्धा खेळवली जाणार आहे.

याबाबत दक्षिण आफ्रिकेचे मुख्य प्रशिक्षक मार्क बाऊचर यांच्याशी बोलणार असल्याचे डिव्हिलियर्सने म्हटले होते. या दरम्यान त्याचा फॉर्म आणि फिटनेसबाबत चर्चा होईल. आयपीएलमधील डिव्हिलियर्सचा परफॉर्मन्स पाहता लक्षात येईल की, त्याचा बॅटिंग फॉर्ममध्ये कोणतीही घसरण झालेली नाही. क्षेत्ररक्षणातही तो उत्कृष्ट आहे. आयपीएल 2021 मध्ये तो पूर्वीसारखाच खोऱ्याने धावा करत होता. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून त्याने सात सामन्यांत 51.75 च्या सरासरीने 207 धावा केल्या. यावेळी, त्याचा स्ट्राइक रेट 164.28 इतका होता.

डिव्हीलियर्सची आयपीएलमधील कामगिरी

एबी डिव्हीलियर्सने 2008 मध्ये आयपीएलमध्ये खेळण्यास सुरुवात केली. दिल्ली डेअरडेवहिल्स (DD) संघाकडून तो आपला पहिला सिझन खेळला होता. त्यावेळी दिल्लीने 1.20 कोटी रुपयांमध्ये त्याला खरेदी केलं होतं. तीन सिझन्सनंतर 2011 मध्ये तो रॉयल चैलेंजर्स बंगळुरु संघात सहभागी झाला. डिव्हीलियर्सला RCB ने त्यावेळी पाच कोटी रुपयांच्या बोलीवर खरेदी केलं होतं. 2011 पासून तो बंगळुरुकडूनच खेळत आला आहे. डिव्हीलियर्सने आतापर्यंत 169 सामने खेळले आहेत. यामध्ये 40.40 च्या सरासरीने त्याने 4 हजार 849 धावा ठोकल्या आहेत. यात त्याने 3 शतकं आणि 38 अर्धशतकं ठोकली आहेत. आयपीएलमध्ये त्याचा स्ट्राईक रेट 151.9 इतका जबरदस्त आहे.

फॉरमॅट
सामने
डाव
नाबाद
धावा
हायस्कोर
सरासरी
चेंडू
चेंडू
स्ट्राईक रेट
शतकं
अर्धशतकं
कसोटी
2004–18
114
191
18
8765
278*
50.7
16077
418
54.5
22
46
ODI
2005–18
228
218
39
9577
176
53.5
9473
104
101.1
25
53
टी-20
2006–17
78
75
11
1672
79*
26.1
1237
34
135.2
0
10
IPL
2008–
176
162
38
5056
133*
40.8
3318
59
152.4
3
40

संबंधित बातम्या

AB De Villiers Birthday | 59 मिनिटात 25 चेंडूत 132 धावा, जेव्हा धोनी-कोहलीच्या मैदानात गाजलं एबीडीचं नाव

IPL 2021 : ‘असं वाटतंच नाही की तो निवृत्त झालाय’, डिव्हिलिर्सच्या बहारदार खेळीचं विराटकडून भरभरुन कौतुक!