IPL 2021 : ‘तेरे बिना मॅच कहाँ रे…’, ए बी डिव्हिलियर्सच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा!

IPL 2021 : 'तेरे बिना मॅच कहाँ रे...', ए बी डिव्हिलियर्सच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा!
ए बी डिव्हिलियर्सचे आयपीएलमधील 5000 रन्स पूर्ण...

दिल्लीविरोधात शानदार 75 धावांची खेळी करताना आयपीएलमध्ये डिव्हिलियर्सने 5000 धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. (IPL 2021 RCB vs DC Ab De villiers Complete 5000 Runs In IPL)

Akshay Adhav

|

Apr 28, 2021 | 7:35 AM

अहमदाबाद : रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरुचा (Royal Challengers Banglore) स्टार बॅट्समन ए बी डिव्हिलियर्स ( Ab De Villiers) आपल्या नावावर आणखी एका खास विक्रमाची नोंद केली आहे. दिल्लीविरोधात शानदार 75 धावांची खेळी करताना आयपीएलमध्ये त्याने 5000 धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. असा कारनामा करणारा तो दूसरा परदेशी खेळाडू ठरला आहे. याअगोदर हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने (David Warner) आयपीएलमध्ये 5000 धावा केल्या होत्या. आयपीएलमध्ये 5000 धावांचा टप्पा गाठणारा डिव्हिलियर्स सहावा फलंदाज ठरला आहे.  (IPL 2021 RCB vs DC Ab De Villiers Complete 5000 Runs In IPL)

‘रेकॉर्डवीर ए बी डिव्हिलियर्स…!’

ए बी डिव्हिलियर्सने आयपीएलमध्ये 5000 धावांचा टप्पा गाठला आहे. दिल्लीच्या अक्षर पटेलला शानदार षटकार खेचत त्याने हा करिश्मा करुन दाखवला. आयपीएलमध्ये 5000 धावा पूर्ण करणारा तो सहावा खेळाडू आहे. त्याने ही कमाल 161 डावांत केली. आयपीएलमध्ये सर्वाधिक रन्स करण्याचा मान विराट कोहलीच्या नावावर आहे. त्याने नुकतेच 6000 रन्स पूर्ण केले आहेत. आयपीएलमध्ये 6000 रन्स करणारा विराट पहिलाच फलंदाज आहे.

डिव्हिलियर्सच्या नावावर आयपीएलमध्ये 3 शतक, 39 अर्धशतक!

आयपीएलमध्ये डिव्हिलियर्सच्या नावावर तीन शानदार शतकं आहेत तसंच 39 तडाखेबाज अर्धशतकं आहेत. डिव्हिलियर्स जागतिक क्रिकेटमध्ये मिस्टर 360 या नावाने ओळखला जातो. कोणत्याही क्षणी मॅच पलटवण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे.

आयपीएलमध्ये कुणाकुणाचे 5000 रन्स?

विराट कोहली आणि ए बी डिव्हिलियर्सच्या अगोदर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा, दिल्लीचा धडाकेबाज सलामीवीर शिखर धवन, हैदराबादचा आक्रमक खेळाडू कर्णधार डेव्हिड वॉर्नर तसंच चेन्नईची दिल आणि जान सुरेश रैनाच्या नावावर आयपीएलमध्ये 5000 रन्स करण्याचा विक्रम आहे.

दिल्लीविरोधात डिव्हिलियर्सची शानदार 75 रन्सची खेळी

रॉयल्स चॅलेजर्स बंगळुरु विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (RCB vs DC ) या संघात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर रोमांचक सामना पार पडला. या सामन्यात ए बी डिव्हिलियर्सने (Ab De Villiers) दिल्लीच्या बोलर्सची पिटाई केली. त्याने केवळ 42 चेंडूत 75 धावांची शानदार खेळी केली. या खेळीत त्याने 3 चौकार आणि उत्तुंग 5 षटकार लगावले. डिव्हिलियर्सच्या खेळीमुळे बंगळुरुला 172 धावा करता आल्या.

(IPL 2021 RCB vs DC Ab De villiers Complete 5000 Runs In IPL)

हे ही वाचा :

Video : ‘बहुत तेज घुमाया ये तो….’ मॅक्सवेलचा षटकार पाहून रिषभ पंतलाही आश्चर्य, स्टम्पमागून हिंदी कॉमेन्ट्री!

IPL 2021 : डिव्हिलियर्सची दिल्लीविरुद्ध तुफानी खेळी, डेव्हिड वॉर्नर म्हणतो, ‘माझा आयडॉल…!’

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें