IPL 2021 : ‘असं वाटतंच नाही की तो निवृत्त झालाय’, डिव्हिलिर्सच्या बहारदार खेळीचं विराटकडून भरभरुन कौतुक!

"असं वाटतंच नाही की डिव्हिलियर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलीय. त्याची आजची खेळी पुन्हा-पुन्हा पाहण्यासारखी आहे", अशा शब्दात त्याने डिव्हिलियर्सवर स्तुतीसुमने उधळली. (Doesnt feel Like Ab de Villiers has retired Says Virat Kohli)

IPL 2021 : 'असं वाटतंच नाही की तो निवृत्त झालाय', डिव्हिलिर्सच्या बहारदार खेळीचं विराटकडून भरभरुन कौतुक!
विराट कोहलीकडून डिव्हिलियर्सच्या खेळीचं कौतुक
Follow us
| Updated on: Apr 28, 2021 | 1:49 PM

अहमदाबाद : नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर पार पडलेल्या दिल्ली विरुद्ध बंगळुरु (DC vs RCB) या सामन्यात बंगळुरुने दिल्लीवर एका धावेने निसटता विजय मिळवला. दिल्लीनेही बंगळुरुला तोडीत तोड उत्तर दिलं. दिल्लीच्या हातातोंडाशी आलेला घास मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj) हिरावून नेला. परंतु बंगळुरुच्या विजयाचा पाया ए बी डिव्हिलिर्सने (AB De Villiers) रचला. त्याने दिल्लीविरोधात केवळ 42 चेंडूत 75 धावांची धमाकेदार खेळी केली. त्याच्या खेळीमुळेच बंगळुरुला 171 धावा करता आल्या आणि मॅचही जिंकता आली. मॅचनंतर कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) ए बी डिव्हिलिर्सच्या खेळीचं तोंडभरुन कौतुक केलं. “असं वाटतंच नाही की डिव्हिलियर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलीय. त्याची आजची खेळी पुन्हा-पुन्हा पाहण्यासारखी आहे”, अशा शब्दात त्याने डिव्हिलियर्सवर स्तुतीसुमने उधळली. (IPL 2021 Dc vs RCB Doesnt feel Like Ab de Villiers has retired Says Virat Kohli)

विराट कोहलीच्या तोंडी डिव्हिलियर्सची न थकता स्तुती

“डिव्हिलियर्सला मी हे सांगितलेलं आवडणार नाही. पण मागील पाच महिन्यापासून त्याने कोणतेही स्पर्धात्मक क्रिकेट सामने खेळलेले नाहीत. असं वाटतंच नाही की डिव्हिलियर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलीय. त्याची आजची खेळी पुन्हा-पुन्हा पाहण्यासारखी आहे, त्याच्या खेळीला माझा सलाम… अशीच बॅटिंग त्याने करत राहो”, अशा शब्दात त्याने डिव्हिलियर्सची स्तुती केली.

“डिव्हिलियर्स ही आमच्यासाठी मालमत्ता आहे. मी पुन्हा सांगतो की (चेहऱ्यावर हास्य आणत) मागील पाच महिन्यापासून त्याने कोणतेही स्पर्धात्मक क्रिकेट सामने खेळलेले नाहीत. पण असं असतानाही त्याने खेळलेली खेळी सुंदर आणि बहारदार आहे”, असं विराट म्हणाला.

दिल्लीविरोधात डिव्हिलियर्सची बॅट तळपली

रॉयल्स चॅलेजर्स बंगळुरु विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स या उभय संघात रोमांचक सामना पार पडला. या सामन्यात ए बी डिव्हिलियर्सने दिल्लीच्या बोलर्सची पिटाई केली. त्याने केवळ 42 चेंडूत 75 धावांची शानदार खेळी केली. या खेळीत त्याने 3 चौकार आणि उत्तुंग 5 षटकार लगावले. डिव्हिलियर्सच्या खेळीमुळे बंगळुरुला 172 धावा करता आल्या.

डिव्हिलियर्सच्या आयपीएलमध्ये 5000 रन्स पूर्ण

डिव्हिलियर्सने दिल्लीविरोधात शानदार 75 धावांची खेळी करताना आयपीएलमधील 5000 धावांचा टप्पा पूर्ण केला. असा कारनामा करणारा तो दूसरा परदेशी खेळाडू ठरला आहे. याअगोदर हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने (David Warner) आयपीएलमध्ये 5000 धावा केल्या होत्या. आयपीएलमध्ये 5000 धावांचा टप्पा गाठणारा डिव्हिलियर्स सहावा फलंदाज ठरला आहे.

‘रेकॉर्डवीर ए बी डिव्हिलियर्स…!’

ए बी डिव्हिलियर्सने आयपीएलमध्ये 5000 धावांचा टप्पा गाठला आहे. दिल्लीच्या अक्षर पटेलला शानदार षटकार खेचत त्याने हा करिश्मा करुन दाखवला. आयपीएलमध्ये 5000 धावा पूर्ण करणारा तो सहावा खेळाडू आहे. त्याने ही कमाल 161 डावांत केली. आयपीएलमध्ये सर्वाधिक रन्स करण्याचा मान विराट कोहलीच्या नावावर आहे. त्याने नुकतेच 6000 रन्स पूर्ण केले आहेत. आयपीएलमध्ये 6000 रन्स करणारा विराट पहिलाच फलंदाज आहे.

(IPL 2021 Dc vs RCB Doesnt feel Like Ab de Villiers has retired Says Virat Kohli)

हे ही वाचा :

Video : रिषभला आऊट दिलं, विराट भलताच खुश झाला, अंपायर्सनी निर्णय बदलताच चेहरा बघण्याजोगा झाला!

IPL 2021 : ‘तेरे बिना मॅच कहाँ रे…’, ए बी डिव्हिलियर्सच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा!

Non Stop LIVE Update
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.