IND vs AFG : अभिषेक शर्माने तिसऱ्या T20 सामन्यात एकाचवेळी बनवले 7 रेकॉर्ड्स, त्याच्या वादाळात अफगाणिस्तानचा पालापाचोळा
IND vs AFG : अभिषेक शर्माने काल अफगाणिस्तान विरुद्ध तुफान बॅटिंग केली. त्याच्या वादळात अफगाणिस्तान पालापाचोळा झाला. त्याने चौफेर फटकेबाजी केली. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये त्याने आपल्या फलंदाजीने वादळ आणलं.

भारताने काल अफगाणिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. तिसऱ्या टी20 सामन्यात 127 धावांनी विजय मिळलून 3-0 ने सीरीज जिंकली. तिसऱ्या सामन्यात भारताच्या विजयाचा हिरो ठरला अभिषेक शर्मा. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात अभिषेक शर्मा तुफानी इनिंग खेळला. त्याने एकाचवेळी अनेक रेकॉर्ड मोडले. अभिषेक शर्माने अवघ्या 34 चेंडूत 108 धावा ठोकल्या. या दरम्यान त्याने 11 सिक्स आणि 9 चौकार लगावले.
अभिषेक शर्माच्या तुफानी फलंदाजीच्या बळावर टीम इंडियाने सात विकेटवर 221 धावा केल्या. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानची टीम 94 धावांवर ऑलआऊट झाली. भारताने 127 धावांनी सामना जिंकला. अभिषेकची ‘प्लेयर ऑफ द मैच’ आणि ‘प्लेयर ऑफ द सीरीज’ पुरस्कारासाठी निवड झाली.
अभिषेकचे एकाच सामन्यात 7 रेकॉर्ड्स
1 अभिषेक शर्माने या सामन्यात अवघ्या 30 चेंडूत शतक झळकावलं. भारताकडून अभिषेकच्या नावावर टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतक बनवण्याच्या रेकॉर्डची नोंद झाली आहे. याआधी हा रेकॉर्ड रोहित शर्माच्या नावावर होता. त्याने 2017 साली इंदूरमध्ये श्रीलंकेविरुद्ध 35 चेंडूत शतक झळकावलं होतं.
2 आयसीसीचा पूर्णवेळ सदस्य असलेल्या देशाकडून टी20 इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतक झळकवण्याचा रेकॉर्ड अभिषेकच्या नावावर नोंदला गेला आहे. याआधी हा रेकॉर्ड संयुक्तपणे सिकंदर रजा आणि फिन एलनच्या नावावर होता. त्यांनी 33-33 चेंडूत शतक झळकावलं होतं. टी20 इंटरनॅशनल क्रिकेटच्या इतिहासातील कुठल्याही फलंदाजाने झळकवलेलं हे तिसरं वेगवान शतक आहे.
3 अभिषेक शर्माने पहिल्या सहाओव्हरमध्ये तुफान फलंदाजी केली. पावरप्लेमध्ये 22 चेंडूत 76 धावा केल्या. मेन्स टी20 इंटरनॅशनलमध्ये पावरप्ले दरम्यान कुठल्याही फलंदाजाने केलेल्या या सर्वाधिक धावा आहेत. याआधी हा रेकॉर्ड पोर्तुगालच्या कुलदीप घोलियाच्या नावावर होत. 2023 मध्ये माल्टा विरुद्ध पावरप्लेमध्ये 25 चेंडूत त्याने 74 धावा केल्या होत्या.
4 अभिषेक शर्माने अवघ्या 16 चेंडूत अर्धशतक झळकावलं. 20 इंटरनॅशनलमध्ये सर्वाधिक 20 वेळा किंवा त्यापेक्षा कमी चेंडूत अर्धशतक झळकवून रेकॉर्ड मजबूत केला आहे. 20 किंवा त्यापेक्षा कमी चेंडूत फिफ्टी झळकवण्याची त्याची सहावी वेळ आहे.
5 अभिषेक शर्माचं टी20 क्रिकेटमधील हे 10 व शतकं आहे. त्याने विराट कोहलीच्या 10 टी20 शतकांशी बरोबरी केली आहे. अभिषेककडे आता टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं झळकवणारा फलंदाज बनण्याची संधी आहे. त्यासाठी त्याला फक्त अजून एका शतकाची आवश्यकता आहे.
6 अभिषेक शर्माने अफगाणिस्तान विरुद्ध टी20 इंटरनॅशनल सीरीजमध्ये एकूण 22 सिक्स मारले. एका टी20 इंटरनॅशनल सीरीजमध्ये कुठल्याही भारतीय फलंदाजाने सर्वाधिक सिक्स मारण्याच्या आपल्याच रेकॉर्डशी त्याने बरोबरी केली आहे. 2025 साली इंग्लंड विरुद्ध टी20 इंटरनॅशनल सीरीजमध्ये त्याने 22 सिक्स मारले होते.
7 अभिषेक शर्माने आपल्या शतकी खेळीच्या 94.44 टक्के धावा फक्त चौकारांमधून केल्या. टी20 इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये शतक झळकवणाऱ्या फलंदाजांमध्ये बाऊंड्रीच्या माध्यमातून काढलेल्या या सर्वाधिक धावा आहेत. अभिषेक या बाबतीत तुर्कीच्या मोहम्मद फहदच्या पुढे निघून गेला.
