
संयुक्त अरब अमीरात (UAE) येथे तिरंगी मालिका सुरु आहे. या मालिकेत अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये चौथा सामना झाला. या मॅचमध्ये अफगाणिस्तानने बलाढ्य पाकिस्तानला 18 धावांनी हरवलं. अफगाणिस्तानचा तिरंगी मालिकेतील हा दुसरा विजय आहे. पाकिस्तानचा टुर्नामेंटमधील हा पहिला पराभव आहे. यात पाकिस्तानी फलंदाज अफगाणिस्तानच्या स्पिनर्ससमोर पूर्णपणे फेल ठरले. या विजयासह अफगाणिस्तानने पाकिस्तानकडून शेवटच्या पराभवाचा बदला घेतला. या मॅचमध्ये अफगाणी फलंदाज इब्राहिम जादरान आणि सदिकउल्लाह अटल शानदार इनिंग खेळले.
या सामन्यात अफगाणिस्तानच्या टीमने पहिली फलंदाजी केली. त्यांनी 20 ओव्हर्समध्ये 5 विकेट गमावून 169 धावा केल्या. अफगाणिस्तानची सुरुवात चांगली झाली नाही. विकेटकीपर फलंदाज रहमानुल्लाह गुरबाज फक्त 8 रन्स करुन पॅव्हेलियनमध्ये परतला. मात्र त्यानंतर इब्राहिम जादरान आणि सदिकउल्लाह अटल यांनी टीमचा डाव संभाळला. दुसऱ्या विकेटसाठी त्यांनी 80 चेंडूत 113 धावांची भागीदारी केली.
तो बाद होताच डाव गडगडला
सलामीवीर सदिकउल्लाहने 45 चेंडूत 3 चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 64 धावा केल्या. तो बाद होताच अफगाणिस्तानचा डाव गडबडला. कुठल्याही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. इब्राहिम जादरानने 45 चेंडूत 8 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 65 धावा केल्या. पाकिस्तानकडून फहीम अशरफने सर्वाधिक चार विकेट्स काढल्या. सॅम अय्यूबला एक विकेट मिळाला. 170 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायला उतरलेल्या पाकिस्तान टीमची सुरुवात खराब झाली.
त्याने पाकिस्तानला मोठ्या पराभवापासून वाचवलं
अफगाणिस्तानच्या 170 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव सुरुवातीपासून अडखळला. त्यांचा निम्मा संघ केवळ 75 धावात तंबुत परतला. एकवेळ पाकिस्तानची हालत 9 बाद 111 झालेली. त्यानंतर वेगवान गोलंदाज हॅरिस रौफ आणि सुफियान मुकिम यांनी 9व्या विकेटसाठी 40 रन्सची भागीदारी करुन पाकिस्तानला मोठ्या पराभवापासून वाचवलं.
आशिया कप आधी पाकिस्तानसाठी वाईट बातमी
हॅरिस रौफने 16 चेंडूत 4 सिक्सच्या मदतीने सर्वाधिक नाबाद 34 धावा केल्या. त्याशिवा फखर जमां 18 चेंडूत 25 रन्सची इनिंग खेळला. कॅप्टन सलमान आगा 15 चेंडूत 20 धावा करुन बाद झाला. अफगानिस्तानकडून वेगवान गोलंदाज फजलहक फारूकी, कॅप्टन राशिद खान, मोहम्मद नवी आणि नूर अहमद यांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या. अफगाणिस्तानकडून झालेला हा पराभव आशिया कप आधी पाकिस्तानसाठी वाईट बातमी आहे. येत्या 9 सप्टेंबरपासून आशिया कप टुर्नामेंटला सुरुवात होणार आहे.