AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बलात्काराचा आरोप असलेल्या पाक खेळाडूसंबंधीत हार्दीक पांड्याचा व्हिडीओ व्हायरल, पाहा काय आहे कारण?

पाकिस्तानचा तरुण क्रिकेटपटू हैदर अली याच्याविरोधात मॅनचेस्टर पोलिस ठाण्यात बलात्काराची तक्रार नोंदवण्यात आली आहे. त्यानंतर पोलिसांनी हैदरला अटक केली आहे. त्यानंतर सोशल मीडियावर हार्दिक पांड्याचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

बलात्काराचा आरोप असलेल्या पाक खेळाडूसंबंधीत हार्दीक पांड्याचा व्हिडीओ व्हायरल, पाहा काय आहे कारण?
Hardik Pandya and Haidar aliImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Aug 08, 2025 | 4:55 PM
Share

पाकिस्तानी क्रिकेट संघ सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्यांचा युवा फलंदाज हैदर अली सध्या मोठ्या अडचणीत सापडला आहे. वयाच्या 24 व्या वर्षी हा खेळाडू बलात्काराच्या प्रकरणात अडकला असून, त्याला मँचेस्टरमध्ये अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर पाकिस्तानात परतण्यास बंदी घालण्यात आली आहे. हैदर अली अडचणीत आल्यानंतर सोशल मीडियावर हार्दिक पंड्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून भारतीय चाहत्यांनी त्याला ‘थँक यू’ म्हटले आहे. जाणून घ्या नेमकं प्रकरण काय आहे?.

पाकिस्तानचा युवा फलंदाज हैदर अली बलात्काराच्या प्रकरणात अडकला आहे. मँचेस्टरमध्ये एका ब्रिटिश मुलीवर बलात्कार केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. या खेळाडूच्या वादग्रस्त प्रकरणानंतर सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये हार्दिक पांड्या दिसत आहे. या व्हिडीओत हार्दिक पांड्या या पाकिस्तानी खेळाडूला चिडवताना दिसत आहे. एवढेच नाही, तर हैदर अली बलात्काराच्या प्रकरणात अडकल्यावर चाहते हार्दिक पांड्याचा हा व्हिडीओ शेअर करून त्याला ‘थँक यू’ म्हणत आहेत.

वाचा: धक्कादायक! पाकिस्तानी क्रिकेटरवर इंग्लंडमध्ये बलात्काराचा आरोप, जाणून घ्या कोण आहे तो?

हार्दिक पांड्या-हैदर अली यांच्यातील टक्कर

हा व्हिडीओ हार्दिक पांड्या आणि हैदर अली यांच्यातील सामन्याचा आहे. 2022 च्या टी-20 विश्वचषकात हे दोघे आमनेसामने आले होते. या सामन्यात हार्दिक पंड्याने हैदर अलीची विकेट घेतली होती. हैदर अलीने हार्दिक पंड्याच्या चेंडूवर लांबलचक षटकार मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू नीट बॅटवर आला नाही आणि परिणामी सूर्यकुमार यादवने सीमारेषेवर सोपा झेल पकडला. हा तोच सामना आहे, ज्यामध्ये विराट कोहलीने तुफानी फलंदाजी करून भारताला पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवून दिला होता. भारताने शेवटच्या चेंडूवर 4 गडी राखून सामना जिंकला होता. विराटने या सामन्यात 53 चेंडूंमध्ये नाबाद 82 धावा केल्या होत्या.

हैदर अलीच्या करिअरवर संकट

हैदर अलीचे करिअर आता धोक्यात आले आहे. जर मँचेस्टरमध्ये तो बलात्काराच्या प्रकरणात दोषी आढळला, तर त्याला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. प्रकरण संपेपर्यंत तो ब्रिटन सोडूही शकत नाही. हैदर अलीने पाकिस्तानसाठी 2 एकदिवसीय सामन्यांमध्ये 42 धावा केल्या आहेत, तर 35 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याने 505 धावा केल्या आहेत. आता वयाच्या अवघ्या 24 व्या वर्षी तो बलात्काराच्या प्रकरणात अडकला आहे आणि असे दिसते की, त्याची पाकिस्तानी संघात परतण्याची शक्यता आता कठीण आहे.

...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.