AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajinkya Rahane VIDEO | अजिंक्य रहाणे-आर्याचा भन्नाट डान्स, चेन्नईतील हॉटेलमध्ये बापलेकीचा फनटाईम

चेन्नईतील हॉटेल रुममध्ये अजिंक्य रहाणे पत्नी राधिका आणि मुलगी आर्या यांच्यासोबत क्वारंटाईन झाला आहे. (Ajinkya Rahane Arya Dance Video )

Ajinkya Rahane VIDEO | अजिंक्य रहाणे-आर्याचा भन्नाट डान्स, चेन्नईतील हॉटेलमध्ये बापलेकीचा फनटाईम
| Updated on: Jan 28, 2021 | 9:10 AM
Share

चेन्नई : ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाला त्यांच्याच भूमीत लोळवून परतलेल्या टीम इंडियाचा कर्णधार अजिंक्य रहाणेवर (Ajinkya Rahane) कौतुकाचा वर्षाव होत आहे. इंग्लंडविरुद्ध आगामी कसोटी मालिकेपूर्वी रहाणे चेन्नईत सहकुटुंब क्वारंटाईन झाला आहे. यावेळी मुलगी आर्यासोबत त्याचा एक भन्नाट डान्स व्हिडीओ समोर आला आहे. (Ajinkya Rahane Arya Rahane Dance Video Chennai Hotel)

अजिंक्य-आर्याचा भन्नाट डान्स

अजिंक्य सोशल मीडियावर आपल्या मुलीसोबत अनेक व्हिडीओ शेअर करत असतो. अजिंक्य आणि आर्याचा असाच एक अनोखा डान्स व्हिडीओ आता चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. अजिंक्यची पत्नी राधिकाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा धमाल व्हिडीओ शेअर केला आहे.

चेन्नईतील हॉटेलमध्ये रहाणे कुटुंब क्वारंटाईन

चेन्नईतील हॉटेल रुममध्ये अजिंक्य रहाणे पत्नी राधिका आणि मुलगी आर्या यांच्यासोबत क्वारंटाईन झाला आहे. पाच महिन्यांच्या दुराव्यानंतर एकत्र आल्यामुळे अजिंक्य या कालावधीत आपल्या मुलीसोबत क्वालिटी टाईम घालवताना दिसत आहे. यावेळी दोघांचा डान्स करतानाचा व्हिडीओ राधिकाने शूट करुन इन्स्टाग्रामवर शेअर केला.

अजिंक्य रहाणेचं मुंबईत जोरदार स्वागत

टीम इंडियाच्या खेळाडूंचं विशेष म्हणजे कर्णधार अजिंक्य रहाणेचं गेल्या आठवड्यात मुंबईत विमानतळावर जोरदार स्वागत करण्यात आलं होतं. विमानतळावरुन अजिंक्य माटुंग्यातील आपल्या राहत्या घरी पोहचला, तिथे त्याचं जल्लोषात  स्वागत करण्यात आलं. रांगोळी काढून ढोल वाजवत सोसायटीतील रहिवाशांनी त्याचं अभिनंदन केलं. यावेळी क्रिकेट प्रेमींनीही रहाणेच्या सोसायटीबाहेर एकच गर्दी केली होती. यानंतर रहाणेच्या हाताने केक कापून सेलिब्रेशन केलं.

अजिंक्यच्या गावातही जल्लोष

अजिंक्य रहाणेच्या गावातही जल्लोष करण्यात आला होता. अहमदनगर जिल्ह्यातील चंदनापुरी या अजिंक्य रहाणेच्या गावात गावकऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारताने इतिहास रचल्याने, गावकऱ्यांचा उर अभिमानाने भरुन आला आहे. अजिंक्य रहाणेच्या घरी फटाके फोडून सेलिब्रेशन करण्यात आलं. इतकंच नाही तर पेढे वाटून गावकऱ्यांनी आनंद साजरा केला. (Ajinkya Rahane Arya Rahane Dance Video Chennai Hotel)

टीम इंडिया इंग्लंडला भिडणार

टीम इंडिया आता इंग्लंडविरोधात खेळणार आहे. इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्याची सुरुवात कसोटी मालिकेपासून होणार आहे. 5 फेब्रुवारीपासून पहिला कसोटी सामना खेळण्यात येणार आहे. भारतात टीम इंडिया कशी कामगिरी करते, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

Ajinkya Rahane | लेक खांद्यावर, बायको बाजूला, घरी परतताच अजिंक्य म्हणाला

Ajinkya Rahane VIDEO | ऑस्ट्रेलिया गाजवून टीम इंडिया मायदेशी, अजिंक्य रहाणेचं केक कापून स्वागत

अजिंक्य रहाणेच्या खिलाडूवृत्तीला सलाम, कांगारुच्या प्रतिकृतीचा केक कापण्यास नकार

(Ajinkya Rahane Arya Rahane Dance Video Chennai Hotel)

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.