Ajinkya Rahane | अजिंक्य रहाणेच्या खिलाडूवृत्तीला सलाम, कांगारुच्या प्रतिकृतीचा केक कापण्यास नकार

रहाणे या स्वभावामुळे सर्वाचा आवडता क्रिकेटपटू बनला आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 20:07 PM, 21 Jan 2021
Ajinkya Rahane | अजिंक्य रहाणेच्या खिलाडूवृत्तीला सलाम, कांगारुच्या प्रतिकृतीचा केक कापण्यास नकार
अजिंक्यचा कांगारुच्या प्रतिकृतीचा केक कापण्यास नकार

मुंबई : ऑस्ट्रेलियाविरोधातील ऐतिहासिक विजयानंतर टीम इंडियाचा (Team India) कर्णधार अजिंक्य रहाणेचं (Ajinkya Rahane) माटुंग्यातील राहत्या घरी अजिंक्यचे जंगी स्वागत झाले. “अजिंक्य आला रे आला” अशा घोषणा देण्यात आल्या. त्याच्या शेजाऱ्यांनी अजिंक्यला भरभरून शुभेच्छा दिल्या. रहाणेसाठी आणि त्याच्या सोसायटीतील शेजाऱ्यांसाठी हा सुवर्ण क्षण होता. मात्र रहाणेने अशा आनंदाच्या क्षणी खिलाडूवृत्तीचं दर्शन घडवून आणलं. सेलिब्रेशन करण्यासाठी अजिंक्यच्या चाहत्यांनी केक आणला. मात्र रहाणेने तो केक कापण्यास नकार दिला. यानंतरही रहाणेने आपल्या चाहत्यांनी मनं जिंकली. (ajinkya rahane refusing to cut the cake of the replica of the kangaroo)

नक्की काय झालं?

रहाणेच्या स्वागत केक कटिंगने करायचं, असं त्याच्या सोसायटीमधील शेजाऱ्यांनी ठरवलं. त्यासाठी कांगारुची प्रतिकृती असलेला केक मागवण्यात आला. कांगारुंचा पराभव केल्याने केकवर कांगारुची प्रतिकृती साकारण्यात आली. रहाणेच्या स्वागतानंतर त्याला हा केक कापण्याची विनंती करण्यात आली. मात्र रहाणेने आपल्यातील खिलाडूवृत्ती दाखवून दिली. कांगारु ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी आहे. यामुळे रहाणेने कांगारुच्या प्रतिकृतीचा केक कापाण्यास नकार दिला. या कृतीमुळे रहाणेचं पुन्हा एकदा कौतुक केलं गेलं.

आतापर्यंत अनेकदा आपल्या खिळाडूवृत्तीने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. रहाणेने 2018 मध्ये अफगाणिस्तानविरोधात कसोटी सामन्यात नेतृत्व केलं होतं. अफगाणिस्तानचा हा पहिलाच कसोटी सामना होता. या सामन्यात अफगाणिस्तानचा पराभव झाला होता. मात्र त्यानंतर रहाणेने मन मोठं करत अफगाणिस्तानसोबत ट्रॉफी शेअर केली. इथपासून ते आतापर्यंत रहाणेने अनेकदा आपल्या वागण्यातून खिलाडूवृत्तीचं दर्शन करुन दिलंय.

दरम्यान टीम इंडिया आता इंग्लंडविरोधात खेळणार आहे. इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्याची सुरुवात कसोटी मालिकेपासून होणार आहे. 5 फेब्रुवारीपासून पहिला कसोटी सामना खेळण्यात येणार आहे. भारतात टीम इंडिया कशी कामगिरी करते, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

संबंधित बातम्या :

Ajinkya Rahane | लेक खांद्यावर, बायको बाजूला, घरी परतताच अजिंक्य म्हणाला

Ajinkya Rahane VIDEO | ऑस्ट्रेलिया गाजवून टीम इंडिया मायदेशी, अजिंक्य रहाणेचं केक कापून स्वागत

(ajinkya rahane refusing to cut the cake of the replica of the kangaroo)