Ajinkya Rahane VIDEO | ऑस्ट्रेलिया गाजवून टीम इंडिया मायदेशी, अजिंक्य रहाणेचं केक कापून स्वागत

अजिंक्य रहाणेच्या घराबाहेर ढोलताशाच्या गजरात, तर कुटुंबाने केक कापून विजयोत्सव साजरा केला (Ajinkya Rahane Home Celebration Cake Cutting)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 10:13 AM, 21 Jan 2021
Ajinkya Rahane VIDEO | ऑस्ट्रेलिया गाजवून टीम इंडिया मायदेशी, अजिंक्य रहाणेचं केक कापून स्वागत

मुंबई : कांगारुंना त्यांच्याच भूमीवर चारी मुंड्या चित करुन विजयी टीम इंडिया मायदेशी परतली. भारतीय क्रिकेट संघाने कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाला धूळ चारुन बॉर्डर-गावसकर ट्रॉफीवर नाव कोरलं. टीम इंडियाच्या विजयात कर्णधार अजिंक्य रहाणेचा (Ajinkya Rahane) मोठा वाटा आहे. अजिंक्यच्या अद्वितीय नेतृत्वाखाली भारताने मिळवलेल्या या दमदार यशानंतर चाहते, कुटुंबीयही आनंदात आहेत. मुंबईतील घरी परतलेल्या अजिंक्यचं त्याच्या कुटुंबीयांनी केक कापून स्वागत केलं. (Ajinkya Rahane returns home Ind Vs Aus Test Match victory Home Celebration Cake Cutting)

ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच होम पीचवर लोळवून टीम इंडिया भारतात परतली. मुंबई विमानतळावर क्रिकेट संघाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. अजिंक्य रहाणेच्या घराबाहेरही ढोलताशाच्या गजरात चाहत्यांनी स्वागत केलं. तर रहाणे कुटुंबाने केक कापून विजयोत्सव साजरा केला. पत्नी राधिका, चिमुरडी आर्याही बाबाच्या यशाने भारावून गेल्या आहेत.

अजिंक्यच्या गावातही जल्लोष

अजिंक्य रहाणेच्या गावात जल्लोष साजरा होत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील चंदनापुरी या अजिंक्य रहाणेच्या गावात गावकऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारताने इतिहास रचल्याने, गावकऱ्यांचा उर अभिमानाने भरुन आला आहे. अजिंक्य रहाणेच्या घरी फटाके फोडून सेलिब्रेशन करण्यात आलं. इतकंच नाही तर पेढे वाटून गावकऱ्यांनी आनंद साजरा केला.

100 वर्षीय आजी झेलूबाईंना आनंद

भारतीय संघ जिंकल्याचा आनंद रहाणेच्या कुटुंबात आहे. नातवाने घराण्याचं नाव काढल्याची भावना शंभर वर्षीय आजी झेलूबाईंची आहे. नातवाने नेमकं काय केलंय, याची जरी कल्पना वयस्कर आजीला नसली, तरी काहीतरी भारी घडलंय, असंच त्यांना वाटतंय.

आजी झेलूबाईचा लाडका अजिंक्य

अजिंक्य रहाणे हा आजी झेलूबाई यांचा अत्यंत लाडका नातू आहे. अजिंक्य रहाणेच्या गावातील बंगल्याचं नावही झेलू आहे. झेलू आजीने वयाची शंभरी पूर्ण केली आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत झेलू आजीनेही मतदानाचा हक्क बजावला होता. (Ajinkya Rahane returns home Ind Vs Aus Test Match victory Home Celebration Cake Cutting)

नवख्या खेळाडूंना घेऊन अजिंक्य रहाणे कसा जिंकला?

ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी टीम इंडियाच्या मागे दुखापतीचं ग्रहण लागलं. विराट पहिल्या सामन्यानंतर भारतात परतला. त्यामुळं अजिंक्यकडे नेतृत्वाची जबाबदारी आली. दुखापत टीम इंडियाची पाठ सोडायला तयार नव्हती. त्यात पहिला सामना भारताने गमावला होता. यामुळे टीम इंडिया मालिकेत 1-0 ने पिछाडीवर होती. रहाणेच्या खांद्यावर टीम इंडियाची जबाबदारी होती. रहाणेने ही जबाबदारी एक फलंदाज आणि कर्णधार अशी दुहेरी भूमिका सार्थपणे पार पाडली. तसेच त्याने नवख्या खेळाडूंना विश्वासात घेतले. रहाणेने आपल्या सहकाऱ्यांना आपला नैसर्गिक खेळ करण्याचं स्वातंत्र्य दिलं. त्याने योग्य वेळी योग्य गोलंदाजीची निवड केली. अचूक फिल्ड सेट केली.

संबंधित बातम्या :

ब्रिस्बेनपासून चंदनापुरीपर्यंत रहाणेंचाच गुलाल, कसोटी मालिका जिंकली, ग्रामपंचायत निवडणुकीतही रहाणे पॅनेल विजयी!

“आमच्या अजिंक्यला कर्णधार करा”, रहाणेच्या कुटुंबात जल्लोष, नातवाच्या कामगिरीने आजी भारावली

(Ajinkya Rahane returns home Ind Vs Aus Test Match victory Home Celebration Cake Cutting)