जेव्हा अजिंक्यच्या लेकीनं त्याच्याच कुशीत सोसायटीचं मैदान गाजवलं

| Updated on: Jan 21, 2021 | 11:53 AM

आर्यानेही इवल्याशा हातांनी टाळ्या वाजवत आपल्या वडिलांच्या धडाकेबाज कामगिरीची वाहवा केली. (Ajinkya Rahane daughter araya)

जेव्हा अजिंक्यच्या लेकीनं त्याच्याच कुशीत सोसायटीचं मैदान गाजवलं
Follow us on

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाने कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाला धूळ चारुन बॉर्डर-गावसकर ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. त्यांनतर कर्णधार अजिंक्य रहाणेचे देशभरातून कौतुक होत आहे. ही दमदार कामगिरी करुन घरी परतल्यानंतर मुंबईतील त्याच्या राहत्या घरी अजिंक्यचे जंगी स्वागत झाले. यावेळी त्याचे शेजारी, सोसायटीतील नागरिक यांनी अजिंक्यला भरभरून शुभेच्छा दिल्या. शेजाऱ्यांसोबतच अजिंक्यची लहान मुलगी आर्याच्या चेहऱ्यावरही तेवढाच आनंद दिसत होता. आर्यानेही इवल्याशा हातांनी टाळ्या वाजवत आपल्या वडिलांच्या धडाकेबाज कामगिरीची वाहवा केली. यावेळी छोटी आर्या पांढरा फ्रॉग घालून वडिलांच्या स्वागतासाठी आली होती. विशेष म्हणजे मला पप्पांजवळच राहायचं आहे म्हणत तिने आईजवळ जाणं नाकारलं. ती संपूर्ण स्वागतसंमारंभात अजिंक्यजवळच होती. अजिंक्यच्या कुशीत राहून तिने सगळ्यांची मनं जिंकत मैदान गाजवलं. यावेळी अजिंक्यची पत्नी राधिकादेखील उपस्थित होती. (Ajinkya Rahane daughter and wife welcomed him with clapping)

मला पप्पांकडेच जायचे आहे…!

ऑस्ट्रेलियाला त्यांच्या होम पीचवर चारी मुंड्या चीत करुन घरी परतल्यानंतर अंजिक्य रहाणेचे त्यांच्या मुंबईच्या घरी जंगी स्वागत झाले. अजिंक्यच्या स्वागतासाठी त्याच्या सोसायटीतील अनेक नागरिक उपस्थित होते. यावेळी ढोल ताशांच्या गजरात रहाणेचे औक्षण केले गेले. यावेळी अजिंक्यची पत्नी राधिका आणि च्यांची मुलगी आर्यासुद्धा हजर होती. अजिंक्यच्या दमदार कामगिरीमुळे त्याला पुश्पगुच्छ देण्यात येत होते. यावेळी लोकांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी अजिंक्य त्याची मुलगी आर्याला पत्नी राधिकाकडे देत होता. राधिकानेसुद्धा आर्याला घेण्यासाठी हात समोर केले. मात्र, कित्येक महिन्यानंतर वडिलांची भेट झाल्यामुळे आर्या आपल्या वडिलांना सोडायला तयार नव्हती. तिने “पप्पांकडेच जायचे आहे” म्हणत अजिंक्यकडे पुन्हा हात केले. या प्रसंगानंतर बाप लेकीतल्या या अतुट प्रेमाची सोसायटीमध्ये चर्चा रंगली होती. त्यानंतर अजिंक्यनेही आपली मुलगी आर्याला सोबत घेऊनच सगळ्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या.

अजिंक्य रहाणेच्या घरी फटाके फोडून सेलिब्रेशन करण्यात आलं. इतकंच नाही तर पेढे वाटून गावकऱ्यांनी आनंद साजरा केला.

दरम्यान, अजिंक्यच्या दमदार कामगिरीची वाहवा संपूर्ण देशातून केली जात आहे. मुंबईत तर त्याचे खास स्वागत झाले. मराठमोळ्या पद्धतीने त्यांचे औक्षण करुन अजिंक्यला शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी त्याची पत्नी राधिका उपस्थित होती. कित्येक महिन्यानंतर पती परतल्यामुळे राधिकाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

संबंधित बातम्या :

टीम इंडियाचं विमान मुंबईत लँड, कारण अजिंक्य रहाणेच्या मागे ‘पवार ब्रँड’!

Ajinkya Rahane VIDEO | ऑस्ट्रेलिया गाजवून टीम इंडिया मायदेशी, अजिंक्य रहाणेचं केक कापून स्वागत

(Ajinkya Rahane daughter and wife welcomed him with clapping)